Ind vs Eng T20 Series 2021: इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 'या' खेळाडूंचा संघात समावेश
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 12 मार्चपासून 5 सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
India’s Squad for Paytm T20I Series Against England Announced: इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 12 मार्चपासून 5 सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळली जाणार आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेला भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे.
इंग्लंड विरुद्ध बीसीसीआयने जाहीर केलेल्या टी-20 मालिकेच्या संघात मुंबईचा सुर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुर्यकुमार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. याशिवाय वरुण चक्रवर्ती, राहुल तेवातिया आणि यष्टीरक्षक म्हणून इशान किशन यांनादेखील भारतीय संघात संधी मिळाली आहे. आयपीएलच्या मागील हंगामात या सर्वांनी जबदरस्त कामगिरी करून अनेकांची मन जिंकली होती. वरूण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र, त्याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी टी नटराजनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएल 14 च्या लीग स्टेज मॅच मुंबईत, तर प्ले ऑफचे सामने मोटेरा स्टेडियममध्ये? DC सह-मालक पार्थ जिंदल यांनी 'हा' दिला इशारा
बीसीसीआयचे ट्वीट-
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकिपर), ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप, शार्दुल ठाकूर.