IND vs BAN 2nd Test 2022: कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीतून वगळल्याने सुनील गावस्कर संतापले, वाचा काय म्हणाले ते

त्यामुळे तमाम क्रिकेट चाहते संतापले आहेत. आता भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

IND vs BAN 2nd Test: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN LIVE) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे तमाम क्रिकेट चाहते संतापले आहेत. आता भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुनील गावस्कर काय म्हणाले ते जाणून घेऊया...

विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात या फिरकीपटूने शानदार गोलंदाजी करत 8 फलंदाजांना बाद केले आणि सामनावीर ठरला. यावरून आता संतापाच्या भरात सुनील गावसकर यांनी तिखट वक्तव्य केलं आहे. सुनील गावसकर म्हणाले, “मॅन ऑफ द मॅच खेळाडूला बाहेर बसवणे, हे अविश्वसनीय आहे. हा एकमेव शब्द आहे जो मी वापरू शकतो आणि तो सौम्य शब्द आहे. मला खूप कठोर शब्द वापरायचे आहेत, परंतु तुम्ही 20 पैकी आठ विकेट्स मिळवणाऱ्या मॅन ऑफ द मॅचला सोडले हे अविश्वसनीय आहे. (हे देखील वाचा: IPL 2023 Purse Remaining For All Teams: शुक्रवारी होणार आयपीएलचा मिनी लिलाव, जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती आहे रक्कम)

आज पहिल्या दिवसात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 227 धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 26 धावा करणारा मुशफिकुर रहीम संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले. अश्विनने खालेद अहमदला उनाडकटकडे झेलबाद करून बांगलादेशचा डाव संपवला.