Steve Smith Record in WTC Final: स्टीव्ह स्मिथने डब्ल्यूटीसीमधील मोठा विश्वविक्रम केला ध्वस्त; एकाच झटक्यात बनला नंबर वन!
स्टीव्ह स्मिथने एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. त्याने जुना विक्रम मोडला आणि त्यावर आपले नाव कोरले. आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दोन अंतिम सामने झाले आहेत. या सामन्यापूर्वी, त्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारताचा अजिंक्य रहाणे होता. त्याने दोन सामन्यांच्या चार डावात 199 धावा केल्या होत्या. पण आता स्टीव्ह स्मिथने त्याला मागे टाकले आहे.
SA vs AUS WTC Final Day 1: जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अडचणीत होता, तेव्हा स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या दरम्यान, स्टीव्ह स्मिथने एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. त्याने जुना विक्रम मोडला आणि त्यावर आपले नाव कोरले. आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दोन अंतिम सामने झाले आहेत. या सामन्यापूर्वी, त्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारताचा अजिंक्य रहाणे होता. त्याने दोन सामन्यांच्या चार डावात 199 धावा केल्या होत्या. पण आता स्टीव्ह स्मिथने त्याला मागे टाकले आहे. लॉर्ड्सवर स्टीव्ह स्मिथने 45 धावा पूर्ण करताच तो रहाणेच्या पुढे गेला. एवढेच नाही तर तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाजही बनला आहे.
टीम इंडिया यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळत नाहीये. भारतीय संघाने 2021 आणि त्यानंतर 2023 मध्ये सलग दोन फायनल खेळले, पण यावेळी संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत आहे. सामन्याचा हा फक्त पहिला दिवस आहे, परंतु आतापर्यंत पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
ट्रॅव्हिस हेड देखील लवकरच 200 धावा पूर्ण करू शकतो
सध्या स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, परंतु अजिंक्य रहाणे अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड देखील फार मागे नाही. त्याने आतापर्यंत दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळल्या आहेत आणि तीन डावांमध्ये 192 धावा केल्या आहेत. तसे, ट्रॅव्हिस हेड रहाणेचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा होती, परंतु तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात फक्त 11 धावा करून बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथने ही संधी सोडली नाही आणि अव्वल स्थान पटकावण्यात यशस्वी झाला.
स्मिथने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सर्वाधिक अर्धशतके झळकावली
दरम्यान, स्टीव्ह स्मिथ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये तीन डावात दोन अर्धशतके झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच सामन्यात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. इतर अनेक फलंदाजांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे. यामध्ये अॅलेक्स कॅरी, ड्वेन कॉनवे, ट्रॅव्हिस हेड, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि केन विल्यमसन यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे, परंतु स्मिथने दोन अर्धशतके झळकावली आहेत.