SL vs ENG: श्रीलंकेच्या विजय-पराजयावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे उपांत्य फेरीसाठी ठरणार भवितव्य, आज गट 1 मधील सर्वात मोठा सामना

उपांत्य फेरीतील (Semi Final) स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.

ENG Team (Photo Credit - Twitter)

इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) यांच्यातील टी-20 विश्वचषक (T20 WC 2022) सुपर-12 च्या गट 1 च्या शेवटच्या सामन्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील (Semi Final) स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. जर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकला तर तो सलग दुसऱ्यांदा आयसीसीच्या या मेगा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचेल. तसेच श्रीलंका हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलिया (AUS) उपांत्य फेरीत पोहोचेल त्यामुळे दोन्ही संघाचे भवितव्य श्रीलंकेवर अवलंबून असणार आहे.

इंग्लंडचा संघ टी-20 विश्वचषकाच्या गट 1 मध्ये 4 सामन्यांत 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने पाच सामन्यांतून सात गुणांसह गट 1 मध्ये अव्वल स्थान गाठून उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. T20 विश्वचषक 2021 चा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, जरी ऑस्ट्रलियाचे गुण इंग्लड पेक्षा जास्त असले तरी इंग्लडता नेट रनरेट ऑस्ट्रेलिया पेक्षा जास्त आहे. (हे देखील वाचा: AUS vs AFG, Full Match Highlights: रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा केला चार धावांनी पराभव, पहा हायलाइट्स)

इंग्लंडला फक्त श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवायचा आहे, कारण दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे देखील 7 गुण आहेत आणि इंग्लंड संघाचे देखील विजयासह 7 गुण होतील, परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे इंग्लंड संघ अंतिम 4 मध्ये पोहोचेल. जर श्रीलंकेच्या संघाने इंग्लंडला पराभूत केले तर ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरी गाठणारा गट 1 मधून दुसरा संघ बनेल. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 4 धावांनी पराभव केला.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif