SRH vs RR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar वरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
SRH vs RR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 26व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने-सामने येतील. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील आजचा आयपीएल सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. रविवार, 11 ऑक्टोबर रोजी आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा डबल धमाका पाहायला मिळेल. भारतीय वेळेनुसार आज 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:00 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी बेन स्टोक्स खेळणार? राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला महत्त्वपूर्ण अपडेट)
एकीकडे सनरायझर्सने विजयाचा रस्ता पकडला आहे, तिथे दुसरीकडे राजस्थान सलग 4 पराभवाने अडचणीत सापडला आहे. राजस्थानने 6 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून 3 गमावले आहेत. रॉयल्सने या हंगामात चांगली सुरुवात केली पण प्रथम 2 सामने जिंकल्यानंतर संघाला सलग 4 पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, गेल्या काही सामन्यात हैदराबादने विजयाचा स्वाद घेतला, पण मधल्या फळीचा फॉर्म हैदराबादसाठी चिंतेचा विषय आहे.
पाहा सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा संघ
सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुद्दा, केन विल्यमसन, विराट सिंह, प्रियम गर्ग, खालील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, संदीप शर्मा, बिली स्टॅनलेक, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, फॅबियन अॅलेन, अब्दुल समद, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, रिद्धिमान सहा, संदीप बवानका आणि श्रीवत्स गोस्वामी.
राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर, समाज सॅमसन, महिपाल लोमरोड़, मनन वोहरा, रियान पराग, रॉबिन उथप्पा, अंकित राजपूत, मयंक मारकंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण आरोन, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, डेविड मिलर, ओशेन थॉमस, बेन स्टोक्स, अँड्र्यू टाय, राहुल तेवतिया, शशांक सिंह, यशस्वी जायसवाल, अनिरुद्ध जोशी, अनुज रावत आणि टॉम कुरन.