SRH vs KXIP, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
SRH vs KXIP, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020च्या 22व्या सामन्यात डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad) आणि केएल राहुलच्या नेतृत्वातील किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आज समोरासमोर येतील. दोन्ही संघांनी या स्पर्धेत पाच सामने खेळले आहेत. हैदराबाद टीम दोन सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, एका विजयासह पंजाब पॉईंट टेबलच्या तळाशी आठव्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2020 चा 22 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जाईल. दोन्ही टीममधील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल, तर टॉस अर्धातास अधिक म्हणजे 7:00 वाजता होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: CSK विरुद्ध पराभवाने कोलकाता नाईट रायडर्सची तिसऱ्या स्थानी झेप; पाहा चेन्नई सुपर किंग्सची स्थिती)
दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीममध्ये जबरदस्त टक्कर पाहायाला मिळेल. आयपीएल 13मध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही टीमला विजय मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही टीममधील आयपीएल रेकॉर्डविषयी सांगायचे झाले तर सनरायझर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आजवर 14 सामने (2013-2019) झाले आहेत. सनरायझर्सने 10 तर पंजाबने 4 सामन्यात विजय मिळविला आहे.
सनरायजर्स हैदराबाद संघ: डेविड वॉर्नर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, बासिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टानलेक, जॉनी बेयरेस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, रिद्धिमान साहा, विराट सिंह, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबियन अॅलेन, अब्दुल समद, संजय यादव.
किंग्स इलेव्हन पंजाब संघ: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णाप्पा गौथम, हरप्रीत ब्रार, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीशा सुचित, ताजिंदर सिंह, हार्डस विल्जॉईन