SRH vs KKR, IPL 2020: लोकी फर्ग्युसनने फेरले डेविड वॉर्नरच्या खेळीवर पाणी, नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबादवर Super विजय

अशा स्थितीत हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरच्या मॅच-विंनिंग डावाच्या जोरावर 5 विकेट गमावून 163 धावांपर्यंत आणि सामना बरोबरी राहिला. यानंतर हैदराबाद आणि केकेआर दरम्यान सुपर-ओव्हरचा खेळ रंगला.

लोकी फर्ग्युसन (Photo Credit: Twitter/IPL)

SRH vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) डबल-हेडरच्या आजच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) टॉस गमावून पहिले फलंदाजी केली आणि 5 विकेट गमावून 163 धावांपर्यंत मजल मारली. अशा स्थितीत सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेविड वॉर्नरच्या (David Warner) नाबाद 47 धावांच्या डावाच्या जोरावर एसआरएचने (SRH) 5 विकेट गमावून 163 धावांपर्यंत आणि सामना बरोबरी राहिला. यानंतर हैदराबाद आणि केकेआर दरम्यान सुपर-ओव्हरचा खेळ रंगला. सुपर-ओव्हरसाठी हैदराबादकडून डेविड वॉर्नर-जॉनी बेअरस्टोची जोडी आली, तर लोकी फर्ग्युसनने केकेआरसाठी (KKR) गोलंदाजी केली. पण फर्ग्युसनने पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला आणि तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समदला बोल्ड केले. हैदराबादने सुपर-ओव्हरमध्ये 2 धावा केल्या केकेआरसाठी 3 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात केकेआरसाठी कर्णधार मॉर्गन आणि कार्तिकने सुपर ओव्हरमध्ये टीमचा विजय निश्चित केला. एसआरएचचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (SRH vs KKR, IPL 2020: एक नंबर! डेविड वॉर्नरने उद्ध्वस्त केला विराट कोहलीचा रेकॉर्ड, परदेशी खेळाडूंमध्येही मिळवले पहिले स्थान)

लक्ष्य पाठलाग करण्यासाठी हैदराबादकडून विल्यमसन आणि बेअरस्टोची जोडी मैदानावर उतरली. दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये विकेट न गमावता संघासाठी 58 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना फर्ग्युसनने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर नितीश राणाकडे विल्यमसनला 29 धावांवर झेलबाद केले. युवा प्रियाम गर्गला बोल्ट करुन फर्ग्युसनने सामन्यात आपली दुसरी विकेट घेतली. पुढच्याच षटकात चक्रवर्तीने बेअरस्टोला 36 धावांवर बाद करून हैदराबादला मोठा धक्का दिला. फर्ग्युसनने मनीष पांडेला शानदार यॉर्करने बोल्ड करून तिसरी विकेट मिळवली. त्यानंतर कमिन्सने विजय शंकरला बाद करून हैदराबादला पाचवा धक्का दिला. वेगवान फलंदाजी करणारा अब्दुल समदला शिमव मावीने बाउंड्री लाईनवर कॅच आऊट केले. फर्ग्युसनने चांगली फिल्डिंग करत झेल पकडला आणि नंतर तो शुभमन गिलच्या दिशेने थ्रो केला. समद 15 चेंडूंत 24 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार वॉर्नरने नाबाद 47 धावांचा डाव खेळत सामना सुपर-ओव्हरमध्ये नेला. केकेआरसाठी यंदा पहिला सामना खेळणाऱ्या लोकी फर्ग्युसनने अचूक गोलंदाजी केली आणि सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय, पॅट कमिन्स, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्यकी 1 गडी बाद केला.

आजच्या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या हैदराबादने सुरुवातीपासूनच नाईट रायडर्सच्या धावांवर वेसण घातले, पण अखेरच्या काही ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक आणि इयन मॉर्गनने केलेल्या फटकेबाजीमुळे केकेआरला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कार्तिकने 14 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या, तर मॉर्गन 23 चेंडूत 34 रन करून अंतिम बॉलवर आऊट झाला.



संबंधित बातम्या

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता