Shubman Gill New Record: शुभमन गिलच्या ऐतिहासिक खेळीने अनेक विक्रमाला घातली गवसनी, प्लेऑफमध्ये रचला इतिहास
तसेच गिलने प्लेऑफमध्ये 129 धावांचे शतक झळकावून इतिहास रचला. प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा तो सातवा फलंदाज ठरला. त्याच वेळी, एकाच सत्रात 2 पेक्षा जास्त शतके झळकावणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला.
आयपीएल 2023 च्या (IPL 2023) क्वालिफायर 2 मध्ये, शुभमन गिलने (Shubman Gill) धडाकेबाज शतकी खेळी करत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजीचा नाश केला. 49 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर गिलने 60 चेंडूत 129 धावा केल्या. आयपीएलच्या या मोसमातील हे त्याचे तिसरे शतक ठरले. तसेच गिलने प्लेऑफमध्ये 129 धावांचे शतक झळकावून इतिहास रचला. प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा तो सातवा फलंदाज ठरला. त्याच वेळी, एकाच सत्रात 2 पेक्षा जास्त शतके झळकावणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. असे अनेक विक्रम त्यांनी केले. (हे देखील वाचा: GT vs MI IPL 2023 Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटनच्या सामन्यापुर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी)
शुभमन गिलच्या खेळीत 5 मोठे विक्रम
एका मोसमात तीन किंवा त्याहून अधिक शतके करणारा शुभमन तिसरा खेळाडू ठरला. (विराट कोहली-4, जोस बटलर-4)
आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा शुभमन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. (23 वर्षे 260 दिवस)
शुभमन गिल आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारा फलंदाज ठरला. (129 धावा)
आयपीएलमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. (केएल राहुल नाबाद 132)
गिल आयपीएल प्लेऑफच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. (10 षटकार)
शुभमन गिलची 800 क्लबमध्ये एन्ट्री
एकाच आयपीएल हंगामात 800 हून अधिक धावा करणारा शुभमन गिल हा चौथा खेळाडू ठरला. त्याच्याआधी फक्त विराट कोहली, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली होती. एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो आता तिसरा खेळाडू ठरला आहे. या मोसमातील 16व्या सामन्यात त्याने 851 धावांची नोंद केली आहे. जोस बटलर (863 धावा, 2022) आणि विराट कोहली (973 धावा, 2016) आता एका हंगामात त्याच्यापेक्षा जास्त धावा करण्यात पुढे आहेत. यंदाच्या मोसमात तो ऑरेंज कॅप जिंकणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आता या डावात शुभमन गिलने केलेले इतर अनेक विक्रम पाहूया:-
आयपीएलमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय
केएल राहुल - 132 नाबाद विरुद्ध आरसीबी, 2020
शुभमन गिल - 129 विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023
ऋषभ पंत - नाबाद 128 विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2018
मुरली विजय - 127 विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2010
आयपीएल हंगामात 100 हून अधिक चौकारांसह भारतीय (4s+6s)
122 - विराट कोहली (RCB, 2016)
111 - शुभमन गिल (GT, 2023)
108 - यशस्वी जैस्वाल (RR, 2023)
105 - ऋषभ पंत (DC, 2018)
आयपीएल प्लेऑफमधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या
गुजरात टायटन्स - 233/3 विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023
पंजाब किंग्ज - 226/6 विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 2014
चेन्नई सुपर किंग्ज - 222/5 विरुद्ध दिल्ली, 2012