'क्वारंटाईन प्रीमिअर लीग'मध्ये आमने-सामने आले शिखर धवन व मुलगा जोरावर, मुलाच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला 'गब्बर', पाहा Video

या सामन्याला शिखरने 'क्वारंटाइन प्रीमिअर लीग' म्हटले. या व्हिडिओमध्ये शिखर बॅटिंग करत आहे तर मुलगा जोरावर गोलंदाजी करत आहे. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे.

'क्वारंटाईन प्रीमिअर लीग'मध्ये शिखर धवन व मुलगा जोरावर (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जग ठप्प झाले आहे. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने सर्व खेळाडू कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. भारतात 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यान खेळाडूंसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ मिळत आहे. खेळाडू आपल्या कुटुंबा समवेत मजा करीत आहेत आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. सध्या शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याने सोशल मीडियावर लॉकडाउन दरम्यान कुटुंबासोबतचे काही व्हिडिओज शेअर केले आहे. आताही टीम इंडियाच्या (Indian Team) 'गब्बर'ने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तो मुलगा जोरावर (Zoravar) सोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. या सामन्याला शिखरने 'क्वारंटाइन प्रीमिअर लीग' म्हटले. लॉकडाउनमुळे क्रिकेटपटू बाहेर जाऊन खेळाचा सराव करू शकत नसल्याने धवन आपल्या कुटुंबासमवेत घरात खेळून खेळाशी संपर्कात असल्याचे सुनिश्चित करत आहे. (शिखर धवनने 'मस्तीखोर' मुलगा जोरावर समवेत 'Daddy Cool' गाण्यावर डान्स, पाहा मजेदार Video)

या व्हिडिओमध्ये शिखर बॅटिंग करत आहे तर मुलगा जोरावर गोलंदाजी करत आहे. धवनने या व्हिडिओवर एक मजेदार कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की 'क्वारंटाईन प्रीमियर लीगचा सर्वात धक्कादायक क्षण…धवन विरुद्ध धवन.' या व्हिडिओमध्ये धवन झोरावारच्या पहिल्या काही चेंडूंवर सहज खेळताना दिसत असून काही आकर्षक शॉट्सही मारत आहे. यानंतर धवन हाफ क्रीजवर येऊन जोरावरला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. जोरावार येथेच थांबत नाही आणि नंतर वडील शिखरला अप्रतिम वेगवान चेंडूवर बोल्ड करून सूड घेतो. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे. पाहा:

 

View this post on Instagram

 

Quarantine Premier League ka sabse gripping moment 😅 Dhawan vs Dhawan 💪🏻😈

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

कोरोना विषाणूमुळे आता आयसीसी टी-20 वर्ल्ड कपदेखील धोक्यात आला आहे. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये पुरुष टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्य असल्याचे दिसत आहे. अनेक खेळाडू रिक्त स्टेडियममध्ये स्पर्धेच्या आयोजनाच्या विरोधात आहे आणि खेळ पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्याची मागणी करत आहे. मात्र आयसीसी ऑगस्टपूर्वी असा कोणताही निर्णय घेणार नाही अशी माहिती एका विश्वस्त स्रोताने टाईम्स ऑफ इंडियाला दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif