IND vs AUS WTC Final 2023: शार्दुल ठाकूरने केली उत्कृष्ट कामगिरी, 9व्या कसोटीतच कपिल देवच्या झाला क्लबमध्ये सामील

शार्दुल ठाकूरने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले आहे. त्याने इंग्लंडमध्ये तीन आणि ऑस्ट्रेलियात एक अर्धशतक झळकावले आहे. यासह, त्याने इतका मोठा विक्रम केला आहे की तो कपिल देव यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Shardul Thakur (Photo Credit - Twitter)

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने ओव्हलवर सलग तिसरे अर्धशतक झळकावले आहे. याआधी 2021 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकले होते. आता पुन्हा एकदा चालू अंतिम सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 109 चेंडूत 51 धावा केल्या आणि टीम इंडियाची धावसंख्या 296 पर्यंत नेण्यात अजिंक्य रहाणेसह महत्त्वाची भूमिका बजावली. शार्दुल ठाकूरने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले आहे. त्याने इंग्लंडमध्ये तीन आणि ऑस्ट्रेलियात एक अर्धशतक झळकावले आहे. यासह, त्याने इतका मोठा विक्रम केला आहे की तो कपिल देव यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

शार्दुल आता (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये 8 किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. कपिल देव, किरण मोरे, हरभजन सिंग यांच्या खास क्लबमध्ये त्याने आपल्या 13व्या कसोटी डावातच स्थान मिळवले. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja New Record: रवींद्र जडेजाने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू)

5 - किरण मोरे (21 डाव)

4 - शार्दुल ठाकूर (13 डाव)

4 - कपिल देव (22 डाव)

4 - हरभजन सिंग (31 डाव)

शार्दुल ठाकूरने गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गब्बा मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विजय आठवत असेल तर शार्दुलने वॉशिंग्टन सुंदरसोबत अर्धशतक झळकावून महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला पहिल्या डावात मोठ्या आघाडीने पिछाडीवर पडण्यापासून वाचवले. पुन्हा एकदा शार्दुलने ओव्हलवर तेच केले. त्याने अजिंक्य रहाणेसोबत 7व्या विकेटसाठी 100 प्लसची भागीदारी करून टीम इंडियाला मोठ्या आघाडीसह मागे पडण्यापासून वाचवले. मात्र, त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली होती, पण एका क्षणी धावसंख्या 225 पर्यंतही कठीण जात असल्याचे दिसत होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Australia BCCI Cheteshwar Pujara David Warner ICC World Test Championship ICC World Test Championship 2023 ICC World Test Championship 2023 Final ICC World Test Championship Final 2023 ICC WTC ICC WTC 2023 ICC WTC 2023 Final Jasprit Bumrah Marnal Labuschagne Mohammed Shami Mohammed Siraj Nathan Lyon Pat Cummins R Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Scott Boland Shubman Gill Steve Smith SURYAKUMAR YADAV Team India Team India vs Australia Test Series Virat Kohli WTC Final 2023 आयसीसी डब्ल्यूटीसी आयसीसी डब्ल्यूटीसी 2023 आयसीसी डब्ल्यूटीसी 2023 फायनल आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आर. अश्विन ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट स्पर्धा चेतेश्वर पुजारा टीम इंडिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर नॅथन लियॉन पॅट कमिन्स बीसीसीआय मारनल लबुशेन मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली शुबमन गिल सूर्यकुमार यादव स्कॉट बोलँड स्टीव्ह स्मिथ
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement