शाकिब अल हसन याचे कथित भारतीय बुकीसह WhatsApp चॅट उघडकीस, IPL 2018 मध्ये फिक्सिंगची दिली होती ऑफर
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मॅच फिक्सिंग ऑफरबद्दल माहिती न दिल्याने शाकिब अल हसनवर हा निर्बंध लादण्यात आला आहे. आयसीसीच्या प्रसिद्धीनुसार, आयपीएल 2018 च्या 26 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन हैदराबाद संघात खेळल्या जाणार्या मॅचपूर्वी शाकिबला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती.
बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघाला मंगळवारी एक मोठा धक्का बसला जेव्हा कसोटी आणि टी-20संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आयसीसीने (ICC) दोन वर्षासाठी बंदी घातली. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मॅच फिक्सिंग ऑफरबद्दल माहिती न दिल्याने शकीबवर हा निर्बंध लादण्यात आला आहे. टीमसाठी ही वाईट बातमी बांग्लादेशच्या भारत (India) दौर्याच्या अगदी आधी आली. आयसीसीच्या प्रसिद्धीनुसार, आयपीएल 2018 च्या 26 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघात खेळल्या जाणार्या मॅचपूर्वी शाकिबला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. शकिब आयपीएल संघसनरायझर्स हैदराबादसाठी खेळतो. आयसीसीच्या मीडिया रिलीजनुसार, दीपक अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीने शाकिबशी संपर्क साधला, जो त्याला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत असायचा. दीपकने पंजाबविरुद्ध मॅचआधीही दीपकने शाकिबशी संघाला आतली माहिती देण्याची मागणी केली होती. (IND vs BAN 2019: शाकिब अल हसन वर बंदीनंतर 'या' खेळाडूंना मिळाली टी-20 आणि टेस्ट कर्णधारपदाची जबाबदारी)
2018 जानेवारीपासून दीपकने शाकिबला अनेक मेसेज पाठवले आणि त्याच्यासह मीटिंगची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला होता. बांगलादेशने श्रीलंका आणि झिम्बाब्वेसमवेत एकदिवसीय तिरंगी मालिका आयोजित केली होती. 19 जानेवारीला बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केले आणि शाकिब सामनावीर ठरला. अग्रवालने शाकिबच्या खेळीबद्दल 'अभिनंदन' केले. आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अग्रवालने 'आम्ही यामध्ये काम करतो की मी आयपीएलपर्यंत थांबू' असा मेसेज शाकिबला पाठवला. या मेसेजमधील 'कामाचा' संदर्भ शाकिबशी होता, ज्याच्याकडे तो संघाची अंतर्गत माहिती विचारात होता." शाकिबने एसीयू किंवा इतर कोणत्याही संबंधित प्राधिकरणाकडे याबद्दल माहिती दिली नाही. चार दिवसांनंतर, अग्रवालने शाकिबला आणखी एक स्पष्ट संदेश पाठवला की, "या मालिकेत काहीही आहे का?" पण, पुन्हा एकदा शाकिबने एसीयू किंवा अगदी बीसीबीला याबाबत माहिती देण्याचे टाळले.
यानंतर आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध मॅचआधी दीपकने एक विशिष्ट खेळाडू खेळत आहे की नाही, असा प्रश्न विचारात व्हाट्सएप मेसेज पाठवला. दीपकने बिटकॉइन, डॉलर अकाउंट्सबद्दल बोलून त्याच्याशी बोलणे सुरू ठेवले आणि आपल्या डॉलरच्या खात्याचा तपशील विचारला. यादरम्यान, शाकिबने पहिले दीपकला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 26 एप्रिल 2018 च्या मेसेजव्यतिरिक्त बरेच मेसेज त्याने डिलीट केले. याबाबत शाकिबने कबूल केले आहे की हे संदेश संघाची अंतर्गत माहिती काढण्याची संबंधित आहेत. या मॅचबद्दल बोलले तर, शाकिबने बॅट आणि बॉलने शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)