SL vs BAN 2nd Test 2025 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; श्रीलंकेने 2 गडी गमावत केल्या 290 धावा, बांग्लादेशवर 43 धावांची आघाडी

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंका संघाने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बांग्लादेश संघाची पहिली डावात केवळ 247 धावांवर सरळ घसरगुंडी उडाली. बांग्लादेशकडून कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही.

SL (Photo Credit- X)

Sri Lanka National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चक्रातील दुसरा कसोटी सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात 25 जूनपासून कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंका संघाने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बांग्लादेश संघाची पहिली डावात केवळ 247 धावांवर सरळ घसरगुंडी उडाली. बांग्लादेशकडून कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही. शादमान इस्लामने 46, मुश्फिकुर रहीमने 35, लिटन दासने 34, आणि तैजुल इस्लामने 33 धावा करत काहीसा प्रतिकार केला. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत बांग्लादेशला रोखलं. श्रीलंकेकडून सोनल दिनुषाने 3, असीथा फर्नांडोने 3, विश्वा फर्नांडोने 2, आणि थरिंदु रतनायके व कर्णधार धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

श्रीलंकेने दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत 2 गड्यांच्या मोबदल्यात 290 धावा केल्या आणि पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली आहे. पथुम निसांका यांनी अप्रतिम फलंदाजी करत 238 चेंडूत 18 चौकारांसह 146 धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी लाहिरू उदारा (40) यांच्यासोबत 88 धावांची सलामी दिली. त्यानंतर दिनेश चंदीमलसोबत 194 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. चंदीमलनेही 93 धावा केल्या.

बांग्लादेशकडून तैजुल इस्लामने 90 धावा देत 1 गडी, आणि नयीम हसनने चंदीमलला बाद करत 1 गडी मिळवला. इतर गोलंदाजांपैकी एबादत हुसैन, नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज प्रभाव दाखवू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका मजबूत स्थितीत असून, बांग्लादेशला सामन्यात परतण्यासाठी चमत्कार घडवावा लागेल. निसांका यांची शानदार खेळी सामन्याचा निर्णायक क्षण ठरू शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement