SA vs WI T20I 2021: पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यानंतर Chris Gayle चे हटके सेलिब्रेशन झाले व्हायरल (Watch Video)

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने ने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर गेल हटके अंदाजात विकेट साजरी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

क्रिस गेल कार्टव्हील विकेट सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)

SA vs WI T20I 2021: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात कॅरेबियन संघाने शानदार कामगिरी करत 21 धावांनी विजय मिळवला. विंडीजकडून कर्णधार कीरोन पोलार्डने स्फोटक खेळी केली तर ड्वेन ब्रावोने चार विकेट्स काढल्या. मागील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसलेल्या ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने (Chris Gayle) चौथ्या टी-20 सामन्यात संघात कमबॅक केलं. गेलला बॅटने काही खास कामगिरी करता आली नाही, परंतु त्याने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर गेल हटके अंदाजात विकेट साजरी करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (WI vs SA Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध Keshav Maharaj ने रचला इतिहास, कसोटी हॅटट्रिक घेणार ठरला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू)

कर्णधार किरोन पोलार्डने धैर्य दाखवत गेलला दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसरी ओव्हर टाकण्यासाठी बोलावले. बॅटने प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या गेलने आपल्या कर्णधाराला चेंडूने अजिबात निराश केले नाही आणि रिझा हेन्ड्रिक्सला (Reeza Hendricks) त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. गेलच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात हेन्ड्रिक्स स्टंप आऊट होऊन माघारी परतला. हेन्ड्रिक्सची विकेट मिळवल्यानंतर युनिव्हर्स बॉस मैदानावर कार्टव्हील करताना दिसला. गेलची विकेट साजरी करण्याची ही शैली चाहत्यांनी खूप पसंत पडली आहे. तसेच सौथ आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनने देखील गेलच्या शैलीचे कौतुक केले. स्टेनने आपल्या ट्विटर पोस्टवर लिहिले की, ‘क्रिस गेलं सर्वात कुलेस्ट क्रिकेट आहे.’

क्रिस गेलचं हटके सेलिब्रेशन

डेल स्टेन

साम्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेत लेंडल सिमन्स व एव्हिन लुईस विंडीजला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. एनरिच नॉर्टजेच्या चेंडूत अवघ्या 7 धावा काढून लुईस पॅव्हिलियनमध्ये परतला. विस्फोटक फलंदाज गेल (5) आणि शिमरॉन हेटमायर (7) देखील काही खास करू शकले नाहीत. तथापि, शेवटच्या ओव्हरमध्ये कर्णधार पोलार्डने पुढाकार घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. पोलार्डने 204 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 25 चेंडूत 51 धावा चोपल्या आणि नाबाद परतला. प्रत्युत्तरात 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 146 धावाच करू शकला. क्विंटन डी कॉकने संघासाठी सर्वाधिक 60 धावा केल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now