RR vs RCB, IPL 2020: स्टिव्ह स्मिथचे दमदार अर्धशतक, रॉयल्सचे आरसीबीला विजयासाठी 178 धावांचे आव्हान

टीमकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने 57, रॉबिन उथप्पाने 41 धावांचे योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्सकडून क्रिस मॉरिसने 4, युजवेंद्र चहलने 2 गडी बाद केले.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: Twitter/IPL)

RR vs RCB, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून धावा 177 केल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर (Royal Challengers Bangalore) 178 धावांचे आव्हान दिले. रॉयल्सकडून संजू सॅमसनला वगळता अन्य फलंदाजांनी प्रभावी कामगिरी बजावली आणि राजस्थानला बेंगलोरविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. टीमकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) 57, रॉबिन उथप्पाने 41, बेन स्टोक्स 15, जोस बटलर 24 आणि सॅमसनने 9 धावांचे योगदान दिले. आजच्या सामन्यात राजस्थानसाठी उथप्पा आणि स्टोक्सची जोडी सलामीला आली. राहुल आणि स्मिथने डेथ ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडला. राहुल तेवतिया नाबाद 19 धावा करून परतला. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्सकडून क्रिस मॉरिसने (Chris Morris) 4, युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2 गडी बाद केले. (RR vs RCB, IPL 2020: स्टिव्ह स्मिथने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सचा पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय)

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान संघाने पाचव्यांदा या आयपीएलमध्ये सलामी जोडीमध्ये बदल केला. आरसीबीविरुद्ध आजच्या सामन्यात उथप्पा आणि स्टोक्स सलामी जोडी म्हणून मैदानात उतरले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली असताना मॉरिसने स्टोक्सला 15 धावांवर विकेटकीपर एबी डिव्हिलिअर्सकडे झेलबाद केले. उथप्पाने 22 चेंडूत 41 करून चहलचा शिकार ठरला. पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सॅमसन चहलच्या गुगलीत फसला आणि स्वस्तात बाद झाला. चौथा धक्का जोस बटलरच्या रुपात बसला जो 24 धावा करून सैनीकडे झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार स्मिथ आणि राहुल तेवतिया टीमचा स्कोर पुढे नेला. या दरम्यान, स्मिथने 30 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक ठोकले. यानंतर अखेरच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मॉरिसने स्मिथला शाहबाझ अहमदकडे बाउंड्री लाईनवर 57 धावांवर झेलबाद केले.

यापूर्वी, राजस्थानचा कर्णधार स्मिथने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने माझ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही, तर बेंगलोरने मात्र मोहम्मद सिराजच्याऐवजी गुरुकिरत सिंह मान आणि शिवम दुबेच्याऐवजी शाहबाज अहमद याला संधी दिली आहे.