RR vs RCB, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी डबल-हेडर सामने खेळले जातील. पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
RR vs RCB, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी डबल-हेडर सामने खेळले जातील. पहिला सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. या हंगामातील आयपीएलचा (IPL) हा 33 वा सामना असेल. मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभूत झालेल्या आरसीबीचा (RCB) खेळ या वेळी कसा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वैयक्तिक प्रभावी डाव खेळूनही राजस्थान रॉयल्सची कामगिरी काही खास राहिली नाही. मागील सामन्यातही त्यांना प्रभाव पत्करावा लागला होता. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
आयपीएलमध्ये आरसीबीने एकीकडे 8 सामन्यात 5 सामन्यात विजय आणि 3 सामने गमावले असून कोहलीची 'विराट' सेना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रॉयल्स यंदा संघर्ष करताना दिसले. रॉयल्सने 8 सामन्यांपैकी 3 जिंकले असून 5 सामन्यात त्यांना प्रभाव पत्करावा लागला आहे. आरसीबी आणि रॉयल्स आपापल्या मागील सामन्यात पराभूत झाले होते, त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही टीम विजय मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करतील.
पाहा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ
जस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर, जोफ्रा आर्चर, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, मयंक मारकंडे, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम कुरन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), पार्थिव पटेल, देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जोश फिलिप, क्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, ईसूरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, पवन देशपांडे, अॅडम झंपा.