RR vs KKR IPL 2021: नया है वह! Riyan Parag-राहुल तेवतियाच्या विकेट सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, सामना सुरु असताना मैदानात घेतली सेल्फी, पहा मजेशीर Photo
राजस्थानच्या मुस्तफिजूर रहमानने 16व्या ओव्हरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या राहुल त्रिपाठीला बाउंड्री लाईनवर युवा फलंदाज रियान परागच्या हाती झेलबाद केलं. यानंतर रियानसह सीमारेषेच्या दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या राहुल तेवतिया सोबत त्याने सर्वांना चकित करत वेगळ्याच पद्धतीने विकेट सेलिब्रेशन केलं.
RR vs KKR IPL 2021: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 18 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून नाईट रायडर्सना पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. अशास्थितीत कोलकाताला निर्धारित ओव्हरमध्ये 9 ओव्हरमध्ये 133 धावाच करता आल्या. यादरम्यान नाईट रायडर्सच्या डावात एका मजेशीर घटनेने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने 16व्या ओव्हरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलकाताच्या राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) बाउंड्री लाईनवर युवा फलंदाज रियान परागच्या (Riyan Parag) हाती झेलबाद केलं. यानंतर रियानसह सीमारेषेच्या दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या राहुल तेवतिया (Rahul Tewatia) सोबत त्याने सर्वांना चकित करत वेगळ्याच पद्धतीने विकेट सेलिब्रेशन केलं. (RR vs KKR IPL 2021 Match 18: Chris Morris याचा कोलकातावर हल्लाबोल, राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य)
कोलकाताच्या डावात राहुल त्रिपाठी आणि क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर अखेरीस पॅट कमिन्स यांचा बाउंड्री लाईनवर कॅच पकडताच परागने सोबत उभ्या असलेल्या तेवतिया सोबत मोबाईलने सेल्फी घेरण्याचा अभिनय करत विकेट साजरी केली. तरीही लक्षात घेण्यासारखे म्हणजे त्यांच्याकडे नाही मोबाईल फोन होता आणि नाही कोणताही फोटो काढला गेला पण त्यांची ही स्टाईल भारीच म्हणायची. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचा फोटो शेअर करण्यात आला असून त्यांनी, “#RRvKKR सामन्याच्या मध्यभागी एक आयपीएल सेल्फी घेतली जाईल कोणास वाटले?” असं कॅप्शन दिलं.
परागने या सामन्यात गोलंदाजी केली नाही परंतु दोन झेल घेतले. परागची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षमता आणि नवीन विकेट सेलिब्रेशनने उत्साहित नेटिझन्सनी कशी प्रतिक्रिया दिली:
सेल्फी सेलिब्रेशन!
पराग-तेवतिया सेल्फी सेलिब्रेशन!
रियान पराग आणि त्याचे सेलिब्रेशन...
नया है वह!
रियान परागचा स्वॅग
दरम्यान, सामन्यात क्रिस मॉरिसने चांगली गोलंदाजी केली व 23 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. कोलकातासाठी राहुल त्रिपाठीने 26 चेंडूत एक चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा ठोकल्या. शिवाय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने 25 तर सलामीवीर नितीश राणाने 22 धावांचे योगदान दिले.