RR vs KKR, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

RR vs KKR, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा 12 वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला जाईल. मागील सामन्यात कोलकाताला पराभवाला सामोरे जावे लागले होते तर राजस्थानने मागील सामना रोमहर्षक पद्धतीने जिंकला होता. राजस्थानने या मोसमात त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत तर कोलकाताने एक विजय आणि एक पराभव नोंदवला आहे. केकेआरला (KKR) आयपीएलमध्ये (IPL) आपली मोहीम कायम ठेवायची असेल तर त्यांना इन-फॉर्म राजस्थानविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. भारतीय वेळेनुसार आज, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत खाली घसरला)

राजस्थान रॉयल्सने आपले पहिले दोन्ही सामने शारजाह  खेळले. पहिल्या दोन्ही हाय स्कोअरिंग सामन्यात त्यांनी अनुक्रमे 216 आणि 226 धावा केल्या. आजवर दोन्ही संघांमध्ये एकूण 21 सामने झाले आहेत. दोघांनी 10-10 सामने जिंकले, तर 1 सामना अनिर्णित राहिला. तथापि, अलीकडील फॉर्मचा विचार केला तर राजस्थान पुढे दिसत आहे. राजस्थानसाठी त्यांच्या फलंदाजांनी दोन्ही सामने जिंकले परंतु त्यांची मोठी समस्या गोलंदाजीची आहे. दोन्ही वेळा संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या. दुसरीकडे, केकेआर मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवानंतर सनरायझर्सचा पराभव करून आपले खाते उघडले. एकीकडे इयन मॉर्गन सनरायझर्सविरूद्ध फिनिशर ठरला तर शुभमन गिलने सलामी फलंदाज म्हणून मोठी भूमिका बजावली.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पाहा:

राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, अँड्र्यू टाय, डेविड मिलर, टॉम कुरन, अनिरुद्ध जोशी , श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरर आणि मयंक मार्कंडे.

कोलकाता नाइट रायडर्स: डेविड वॉर्नर (कॅप्टन), केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, मोहम्मद नबी, प्रियम गर्ग, विजय शंकर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), विराट सिंह, भुवनेश्वर कुमार, बेसील थंपी, अभिषेक शर्मा, बिली स्टॅनलेक, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, जेसन होल्डर, बावनका संदीप, फॅबियन ऍलन, अब्दुल समद, संजय यादव आणि रशीद खान.