RR vs DC IPL 2021 Match 7: राजस्थान रॉयल्सचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात झाले मोठे बदल, पहा Playing XI

इंडियन प्रीमियर लीग 14च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आपसात भिडणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थान कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल झाले आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

RR vs DC IPL 2021 Match 7: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14च्या सातव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आपसात भिडणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थान कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. कगिसो रबाडाचे (Kagiso Rabada) दिल्ली इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले असून ललित यादवला दिल्लीकडून डेब्यूची संधी मिळाली आहे. तर राजस्थानने दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतलेल्या बेन स्टोक्सच्या जागी डेविड मिलरचा (David Miller) समावेश केला आहे श्रेयस गोपालच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश केला आहे. आजच्या सामन्यात दोन विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने येत आहेत. पंत आणि सॅमसन पहिल्यांदा आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. (RR vs DC IPL 2021: Wasim Jaffer यांनी मजेदार Mankading मिम शेअर करत राजस्थानला दिली चेतावणी, पहा रॉयल्सची रिअक्शन)

दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरेल. शॉ-धवनच्या जोडीने यापूर्वी देखील संघाला शानदार सुरूवात करून देत वर्चस्व गाजवले आहेत त्यामुळे आजच्या सामन्यात देखील त्यांच्याकडून अशीच अपेक्षा असेल. कर्णधार रिषभ पंत तिसऱ्या स्थानावर अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोइनिस आणि नवोदित ललित यादव मधल्या फळीत दिसतील. त्यानंतर रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, क्रिस वोक्स आणि आवेश खान असे घातक गोलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत. दुसरीकडे, राजस्थानच्या टॉप-ऑर्डरमध्ये मोठा बदल झाला आहे. दुखापतग्रस्त स्टोक्सच्या जागी डेविड मिलचा समावेश झाला आहे तर श्रेयस गोपालला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. मनन वोहरासह जोस बटलर रॉयल्सकडून डावाची सुरुवात करेल तर शिवम दुबे चौथ्या स्थानावर उतरेल.

पहा रॉयल्स-कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), डेविड मिलर, मनन वोहरा, जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, टॉम कुरन, कगिसो रबाडा, क्रिस वोक्स आणि आवेश खान.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now