RR vs DC IPL 2021 Match 7: David Miller चे अर्धशतक, Chris Morris याची पैसावसूल बॅटिंग; थरारक सामन्यात राजस्थानने 3 विकेटने हिसकावला दिल्लीच्या हातातून सामना!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 7व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने डेविड मिलरचे दमदार अर्धशतक आणि क्रिस मॉरिसच्या अखेरच्या ओव्हरमध्ये केलेल्या आतषबाजीच्या जोरावर 3 विकेटने शानदार विजय मिळवला. यासह राजस्थानने आयपीएल 14 मधील पहिल्या विजयाची नोंद केली तर दिल्लीला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

डेविड मिलर (Photo Credit: Twitter/@IPL)

RR vs DC IPL 2021 Match 7: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या (IPL) 7व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) डेविड मिलरचे  (David Miller) दमदार अर्धशतक आणि क्रिस मॉरिसच्या (Chris Morris) अखेरच्या ओव्हरमध्ये केलेल्या आतषबाजीच्या जोरावर 3 विकेटने शानदार विजय मिळवला. यासह राजस्थानने आयपीएल 14 मधील पहिल्या विजयाची नोंद केली तर दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीकडून धावांचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असताना मिलरने सूत्रे हाती घेतली आणि अर्धशतकी खेळी करत आयपीएलमध्ये आगमनाची घोषणा केली. मिलरने चौकार-षटकारांची आतषबाजी करत 62 धावांची खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही. राहुल तेवतियाने 19 धावांचे योगदान दिले तर मॉरिस 36 धावा आणि जयदेव उनाडकट 11 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर कगिसो रबाडा आणि क्रिस वोक्सने प्रत्येकी 2 गडी बाद केले. (RR vs RC IPL 2021: हवेत इंच उडी घेऊन Sanju Samson ने एका हाताने पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून व्हाल फॅन Watch Video)

विजयासाठी मिळालेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सावध सुरुवात केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अवध्या 5 धावा राजस्थाननं केल्या पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये राजस्थानच्या 3 विकेट्स पडल्या ज्यामुळे राजस्थानची अवस्था चौथ्याच ओव्हरमध्ये 17 धावांवर 3 विकेट अशी झाली. रॉयल्सच्या हातून सामना निसटताना दिसत असताना मिलर एक टोक धरून राहिला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. मिलरने शिवम दुबेसह राजस्थानच्या डाव सावरण्यास सुरुवात केली असताना आठव्या ओव्हर खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनने स्लीपमध्ये दुबेचा झेल पकडला. दुबेपाठोपाठ रियान परागने देखील चाहत्यांची निराशाच केली आणि 2 धाव करून तंबूत परतला. यानंतर तेवतियासह मिलरने संघाचा डाव सावरला. यादरम्यान मिलरने आणि अर्धशतक ठोकलं. अर्धशतकी खेळीनंतर मिलरने गिअर बदलला आवेश खानच्या गोलंदाजीवर आऊट होण्यापूर्वी सलग दोन षटकार खेचले. मिलरने  43 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 62 धावांची खेळी केली. अखेरीस आयपीएल लिलावात महागडा ठरलेल्या मॉरिसने फटकेबाजी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

यापूर्वी, दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने 51 धावांची खेळी करत आणि संघाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 147 धावांपर्यंत मजल मारली तर राजस्थानकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now