Watch Photo: युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या 'या' फोटोला रोहित शर्माची पत्नी रितिकाने दिली 'अशी' प्रतिक्रिया

कोरोना विषाणूने जगावर हाहाकार माजवला आहे. परिणामी, जगभरातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. क्रिडा विश्वावरही याचा मोठी परिणाम झाला आहे. दरम्यान, भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघ गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे.

Ritika Sajdeh (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूने जगावर हाहाकार माजवला आहे. परिणामी, जगभरातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. क्रिडा विश्वावरही याचा मोठी परिणाम झाला आहे. दरम्यान, भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघ गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. मात्र, या कालावधीत अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. दरम्यान, भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल(Yujvendra Chahal) आणि फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात अनेक दिवसांपासून अनोखा सामना रंगला आहे. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची चांगलीच थट्टा उडवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु, युजवेंद्र चहलने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोला रोहितची पत्नी रितिका (Ritika Sajdeh) प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकलेली नाही.

युजवेंद्र चहलने नुकताच एक रोहित शर्मासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘मला सुपरहिरोची गरज नाही, माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे’, असे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. युजवेंद्र चहले शेअर केलेला फोटो पाहून आणि फोटोखालील कॅप्शन वाचून रितिकाने Aaawwwww अशी कमेंट करत तिने त्या कॅप्शनला पसंती दर्शवली आहे. युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा यांची मैत्री साऱ्यांनाच माहिती आहे. सोशल मीडियावरही त्यांची मजा मस्करी नेहमीच सुरू असते. एकदा चहलने पोस्ट केलेल्या फोटोवरून रोहितने त्याची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यानंतर चहलने रोहित शर्माचा महिला वेशातील फोटो(फिमेज वर्जन) पोस्ट केला होता. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. हे देखील वाचा- Sachin Tendulkar Enjoys Mumbai Rains: मुंबईच्या पावसात भिजताना सचिन तेंडूलकर झाला Nostalgic; मुलगी सारा तेंडूलकरने कॅमेरामध्ये कैद केल्या भावना (Watch Video)

युजवेंद्र चहल याची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

I don’t need a superhero, I have a big brother 🤙🏻 #throwback

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघऑगस्टच्या आधी मैदानात उतरणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now