Rohit Sharma Records: रोहित शर्माचा आणखी एक धमाका, 11 हजार धावा ठोकून सचिननंतर बनला सर्वोत्तम ओपनर; गावस्कर-हेडनसारख्या दिग्गजांनाही पछाडले
सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात त्याने सुनील गावस्कर आणि मॅथ्यू हेडन सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रोहितने 246 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
IND vs ENG 4th Test Day 3: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) टीम इंडियाचा (Team India) ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) शनिवारी आणखी एक कामगिरी केली. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात त्याने सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि मॅथ्यू हेडन सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रोहितने 246 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्या आधी टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 241 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. रोहितने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या. ही करणारा रोहित भारताचा चौथा सलामीवीर आहे. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी हा पराक्रम केला होता. याशिवाय त्याच्या डावादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा देखील पूर्ण केल्या. (IND vs ENG 4th Test: ओव्हलवर Rohit Sharma याची कमाल, सचिन तेंडुलकर-विराट कोहलीच्या ‘या’ विशेष क्लबमध्ये झाला सामील)
रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 246 डावांमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या आणि एलिट यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. रोहितने 251 डावांमध्ये 11,000 धावा करणाऱ्या मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला. दुसरीकडे, भारतासाठी सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. तर सलामीवीर म्हणून 11,000 धावा पूर्ण करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक धावा करणारा वीरेंद्र सेहवाग आहे, ज्याने एकूण 16,119 धावा केल्या आहेत. तसेच सचिन तेंडुलकर 15,335 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार गावस्कर 12,258 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. रोहितनंतर या यादीत त्याचा सलामी साथीदार शिखर धवन आहे ज्याने आतापर्यंत 10,179 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सध्याच्या अक्टिव्ह सलामी फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा 11,000 धावा करणारा चौथा फलंदाज आहे. ओपनर म्हणून सर्वाधिक 18,847 धावांचा रेकॉर्ड सध्या क्रिस गेलच्या नावावर आहेत. त्याच्यानंतर डेविड वॉर्नरने 14803, तमीम इक्बालने 14173 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
तसेच जानेवारी 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात रोहितने तेंडुलकर (214 डाव) च्या मागे सलामीवीर म्हणून 10,000 धावांच्या क्लबमध्ये दुसरा सर्वात जलद (219 डाव) फलंदाज देखील बनला होता. शुक्रवारी रोहित शर्माने 15 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा रोहित 8 वा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या पूर्वी सचिन, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी, सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा पराक्रम केला होता. तथापि रोहितने 397 व्या डावात 15 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. या यादीत तो 5 व्या क्रमांकावर असून विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहलीने 333 डावांमध्ये सर्वात जलद 15,000 धावा पूर्ण केल्या.