Ritika Sajdeh Drops ‘Yellow Heart’: मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व ठीक? CSK च्या पोस्टवर रितिका सजदेहने दिली अशी प्रतिक्रिया
जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सीएसकेच्या या पोस्टवर रितिकाने पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजीद्वारे कमेंट केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपल्या खेळाडूंची एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेते. हा संघ लीगमधील सर्वोत्तम मानला जातो. संघातील वातावरण नेहमीच आनंददायी राहिले आहे. संघाच्या मालक नीता अंबानी अनेक वेळा खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटताना दिसल्या आहेत. मात्र, आयपीएल 2024 पूर्वी संघाने आपला चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवण्याचा निर्णय घेतल्याने संघातील वातावरण गंभीर झाले आहे. आता रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियावर हिटमॅनच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून, त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहकडून आली आहे.
जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सीएसकेच्या या पोस्टवर रितिकाने पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजीद्वारे कमेंट केली आहे. दुसरीकडे, मुंबईनेही रोहित शर्माच्या सन्मानार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, मात्र त्यावर रितिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. (हेही वाचा: Hardik Pandya New Mumbai Indians Captain: आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार; रोहित शर्माला पदावरून हटवले)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2023 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

