Hardik Pandya New Mumbai Indians Captain: आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार; रोहित शर्माला पदावरून हटवले

रोहित 2013 पासून संघाचा कर्णधार होता. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Hardik Pandya New Mumbai Indians Captain: आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार; रोहित शर्माला पदावरून हटवले
Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

Mumbai Indians Captain in IPL 2024: आयपीएल 2024 (IPL 2024) च्या आधी, मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघाला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्माला फ्रँचायझीने त्याच्या पदावरून हटवले आहे. रोहित 2013 पासून संघाचा कर्णधार होता. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. हार्दिक नुकताच गुजरात टायटन्सच्या ट्रेडमध्ये पुणे मुंबई इंडियन्समध्ये आला होता. याआधी तो 2015 ते 2021 पर्यंत मुंबईचा भाग होता. 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने प्रथमच विजेतेपद पटकावले होते. 2022 च्या लिलावापूर्वी मुंबईने हार्दिकला सोडले होते, पण 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. (हेही वाचा: Year Ender 2023: रिंकूच्या 5 षटकारांपासून ते यशस्वीच्या सर्वात वेगवान अर्धशतकापर्यंत, आयपीएल 2023 मध्ये झाले हे आश्चर्यकारक विक्रम)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).