IPL Auction 2025 Live

RCB vs SRH, IPL 2020: आरसीबीच्या पराभवाची हॅटट्रिक! सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट 'विराट' विजय

यासह विराट कोहलीच्या आरसीबीला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या विजयाने प्ले ऑफच्या शर्यतीत आणखीन रंगात आणली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

RCB vs SRH, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 121 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) 5 विकेटने विजय मिळवला. यासह विराट कोहलीच्या आरसीबीला (RBC) सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या विजयाने प्ले ऑफच्या शर्यतीत आणखीन रंगात आणली आहे. हैदराबादच्या 13 सामन्यातील हा सहावा विजय ठरला आणि त्यांनी 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर चौथ्या स्थानावर झेप घेतली. याशिवाय आजच्या सामन्यातील पराभवाचा आरसीबीला फटका बसला नाही आणि गुणतालिकेतील त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. आरसीबीचे 13 सामन्यात 14 गुण आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादकडून रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) सर्वाधिक 39 धावा आणि मनीष पांडेने (Manish Pandey) 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, आरसीबीसाठी युजवेंद्र चहलने सर्वाधिक 2 तर ईसूरु उदाना आणि वॉशिगनतन सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (RCB vs SRH, IPL 2020: एबी डिव्हिलियर्सचा धमाका, 9000 टी-20 धावा करणारा बनला पहिला दक्षिण आफ्रिकी फलंदाज)

बेंगलोरने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. वॉशिंग्टन सुंदरने डेविड वॉर्नरला अवघ्या 8 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर मनीष पांडेने 26 धावांचे योगदान दिले आणि चहलच्या चेंडूवर क्रिस मॉरिसकडे कॅच आऊट झाला. साहाने एसआरएचकडून 32 चेंडूंत 39 धावा फटकावल्या आणि चहलने त्याला डिव्हिलियर्सकडे झेलबाद केले. साहा पाठोपाठ केन विल्यमसनही 8 धावा करून माघारी परतला. अभिषेक शर्माही 8 धावा करून सैनीच्या चेंडूवर माघारी परतला. अखेरीस जेसन होल्डरने संघाचा विजय निश्चित केला. होल्डर नाबाद 26 धाव करून परतला.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करायला आलेल्या आरसीबी फलंदाज सनरायझर्स गोलंदाजांपुढे संघर्ष करताना दिसले. एकही फलंदाज मोठा डाव खेळी शकला नाही. आरसीबीने सर्व दिग्गज हैदराबादपुढे ढेर झाले. आरसीबीकडून जोश फिलिपने सर्वाधिक 32 धावा केल्या, एबी डिव्हिलियर्सला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डिव्हिलिअर्सने 21 धावा केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या, तर टी नटराजन, शाहबाझ नदीम आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.