RCB vs RR, IPL 2020: आउट की नॉट आउट? संजू सॅमसनच्या विकेटची रंगली चर्चा, अनियंत्रित निर्णयावरून नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरला सुनावलं (Watch Video)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनच्या विकेटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे आणि थर्ड अंपायरने भारतीय युवा फलंदाजाला चुकीचे बाद ठरवल्याचा अनेकांचा असा विश्वास आहे. दरम्यान, सॅमसन बाद झाल्यावर सोशल मीडियावर तो नाबाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

संजू सॅमसन (Photo Credits: IANS, Twitter)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात शारजाह येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनच्या (Sanju Samson) विकेटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे आणि थर्ड अंपायरने भारतीय युवा फलंदाजाला चुकीचे बाद ठरवल्याचा अनेकांचा असा विश्वास आहे. 25 वर्षीय क्रिकेटरने आयपीएल (IPL) 2020 ची शानदार सुरुवात केली आणि पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतकी डाव खेळला. पण, त्यानंतर त्याने त्याची लय गमावली आणि नंतरच्या दोन्ही सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. स्टीव्ह स्मिथच्या बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सॅमसनला युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) अवघ्या चार धावांवर बाद केले. आयपीएलमध्ये आरसीबी फिरकी गोलंदाजाविरुद्ध सॅमसनचा विक्रम खराब राहिला आहे. मात्र, यावेळी विकेट वादग्रस्त दिसली. (RCB vs RR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा हल्लाबोल! महिपाल रोमरोर याची झुंज, RCB समोर 155 धावांचे लक्ष्य)

चौथ्या ओव्हरमध्ये सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यासाठी चहल आला. त्याने योजनाबद्ध प्रकारे चेंडू सॅमसन समोर ढकलला. सॅमसनने चेंडू चहलच्या दिशेने जमिनीच्या दिशेने मारला. ते पाहताच चहलने चपळता दाखवत आपल्या उजव्या दिशेला झेप घेत त्याचा कॅच पकडला. मैदानावरील अंपायरने निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला ज्यांनी त्याला बाद घोषित केले. पाहा सॅमसनची विकेट...

दरम्यान, सॅमसन बाद झाल्यावर सोशल मीडियावर तो नाबाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सॅमसनच्या विकेटने यूजर्स नाखूष होते कारण त्यांचा विश्वास होता की सॅमसनला अन्यायपूर्वक बाद केले गेले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आणि त्यांच्या पंचांना फटकारले.

संशयाचा फायदा

विकेट ढापली

बॉलने ग्राउंडला स्पर्श केला

थर्ड अंपायर?

नाबाद

आजच्या सामन्यात टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. अशाप्रकारे राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या आरसीबीसमोर (RCB) 155 धावांचे लक्ष्य ठेवले. टीमकडून महिपाल लोमरोरने एकाकी झुंज दिली आणि सार्वधिक 47 धावा केल्या. राहुल तेवतिया 24 आणि जोफ्रा आर्चर 16 धावा करून नाबाद परतले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now