RCB vs RR, IPL 2020: स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा बेंगलोर-राजस्थानचे प्लेइंग इलेव्हन

बेंगलोर आणि राजस्थानमधील आजचा सामना अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 15व्या सामन्यात रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. बेंगलोर आणि राजस्थानमधील आजचा सामना अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यासाठी कोहलीने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला नसून राजस्थानने एक बदल केला आणि अंकित राजपूतला (Ankit Rajpoot) बाहेरचा रास्ता दाखवला. एकीकडे विराट कोहलीच्या आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला, तर राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातून रॉयल्स विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील, तर रॉयल चॅलेंजर्स आपला विजयी फॉर्म कायम ठेवू पाहतील. (RCB vs RR, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

राजस्थानने या मोसमात दमदार सुरुवात केली आहे, म्हणून टीकेनंतर कोहलीची टीम रुळावर येताना दिसत आहे. गेल्या सामन्यात राजस्थानने कोलकाताविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता परंतु संघ बराच संतुलित दिसत आहे. बेंगलोरने मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता त्यामुळे कोहलीने विजयी संघ बदलला नाही. बेंगलोरकडून आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कलसह सलामीला येतील तर मधल्या फळीत कर्णधार कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, गुरकीत सिंग जबाबदारी सांभाळतील. गोलंदाजीत संघाकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झंपा आणि वॉशिंग्टन सुंदरची अपेक्षा असेल. वेगवान गोलंदाजीत नवदीप सैनी आणि इसुरु उदाना त्यांना साथ देतील. दुसरीकडे, राजस्थानकडून डावाची सुरुवात जोस बटलर आणि कॅप्टन स्मिथ करतील. मधल्या फळीत संजू सॅमसन, उथप्पा आणि राहुल तेवतिया दिसतील. टॉम कुरन आणि रियान परागाही फलंदाजीने संघाला चांगले योगदान देऊ शकतात. राजस्थानकडे जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर असे वेगवान गोलंदाज आहेत जे टॉमला पाठिंबा देतील. राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल म्हणून अंकित राजपूतच्या जागी महिपाल लोमरोरला संधी दिली.

पाहा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचे प्लेइंग इलेव्हन:

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह मान, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ईसूरु उदाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि अ‍ॅडम झंपा.

राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, टॉम कुर्रान, श्रेयस गोपाल, महिपाल लोमरोर आणि जयदेव उनाडकट.



संबंधित बातम्या