IPL Auction 2025 Live

RCB vs KXIP, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Photo)

RCB vs KXIP, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा 31वा सामना शारजाह मैदानावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि केएल राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात खेळला जाईल. मागील सामन्यात बेंगलोरला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. सलग पराभवाची मालिका मोडण्याचा आजच्या सामन्यात पंजाबचा प्रयत्न असेल. संघ सध्या पंजाब टीम गुणतालिकेच्या तळाशी असून बेंगलोर टीम 10 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय वेळेनुसार आज 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Mid-Season Prediction: CSK पहिल्यांदाच प्ले-ऑफमधून बाहेर पडणार? आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB पहिल्या 4 मध्ये जागा निश्चित करण्याच्या तयारीत)

या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने एकच विजय मिळविला आहे. आणि त्यांनी तो विजय आरसीबी विरुद्ध मिळवला होता. दोन्ही टीममधील सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शतकी खेळी केली होती आणि बेंगलोरला 97 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मागील सामन्यातील आत्मविश्वास घेऊन पंजाब  सामन्यासाठी मैदानावर उतरतील. दुसरीकडे, गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याच्या उद्देशाने आरसीबी आज पंजाबचा सामना करेल.

पाहा आरसीबी आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), पार्थिव पटेल (विकेटकीपर), आरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, ईसूरु उदाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, अ‍ॅडम झंपा.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, करून नायर, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जेम्स नीशम, तजिंदर सिंग, क्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, मुरुगन अश्विन, जगदीशा सुचित, कृष्णाप्पा गौथम, हार्दस विल्जॉईन, सिमरन सिंह.