RCB vs KKR, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

सामना 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स (Photo Credit: File Image)

RCB vs KKR, IPL 2020 Live Streaming: आयपीएलच्या (IPL) 13व्या सत्राचा 28वा सामना शारजाह येथे आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. आयपीएलच्या गुणतालिकेत केकेआर (KKR) तिसऱ्या आणि आरसीबी (RCB) चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यात कोलकाताला विजयाची हॅटट्रिक लावण्याची संधी असेल. केकेआरने शेवटच्या ओव्हरमध्ये मागील दोन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मागील सामन्यात बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात मोठा विजय नोंदविला. भारतीय वेळेनुसार आज 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:00 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी काही विशेष ऑफर घेऊन आले आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन लाईव्ह मॅचचा आनंद लुटू शकतात. (Sunil Narine Bowling Action: KKRच्या सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन बेकायदेशीर, पुन्हा आढळल्यास आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करण्यापासून होईल निलंबित)

केकेआर आणि आरसीबीसमोर आजच्या सामन्यात आपल्या कामगिरी सातत्य राखण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघाचे चिंतेचे कारण त्यांची फलंदाजी आहे. केकेआरकडून नितीश राणा, सुनील नारायण आणि आंद्रे सरेल यांना अद्याप सूर गवसलेला नाही. दुसरीकडे, आरसीबीसाठी आरोन फिंच आणि एबी डिव्हिलियर्स संघर्ष करताना दिसत आहे. गोलंदाजीत क्रिस मॉरिस सामील झाल्याने बाजू मजबूत झाली आहे, तर केकेआरची डेथ गोलंदाजी चांगली सिद्ध झाली आहे.

पाहा आरसीबी आणि केकेआर संघ

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: आरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, ऍडम झंपा, इसरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कॅप्टन/विकेटकीपर), शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, राहुल त्रिपाठी, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी.