
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: आयपीएल 2025 चा अंतिम सामना (IPl 2025) आज म्हणजेच 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळवला जात आहे. क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
This is the lowest first innings score in Ahmedabad this season 👀
🔗 https://t.co/e6pVGw8dMg | #IPL2025 pic.twitter.com/6hsUqym3g8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 3, 2025
कोहलीने केल्या सर्वाधिक 43 धावा
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त 18 धावांवर पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि मयंक अग्रवाल यांनी मिळून डाव सांभाळला आणि संघाचा धावसंख्या 55 धावांच्या पुढे नेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून 190 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीने 43 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान विराट कोहलीने 35 चेंडूत तीन चौकार मारले. विराट कोहलीशिवाय कर्णधार रजत पाटीदारने 26 धावा केल्या.
अर्शदीप सिंगने घेतल्या तीन विकेट
दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने पंजाब किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पंजाब किंग्जसाठी काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंग व्यतिरिक्त, युजवेंद्र चहल, अझमतुल्ला उमरझाई आणि विजयकुमार विशाख यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 191 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकायचे आहे.