IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभवानंतर रवींद्र जडेजा याची स्थिती कशी होती, सांगतेय त्याची पत्नी रिवाबा
रिवाबा म्हणाली की, की, "पराभवानंतर त्याचं रडणं थांबत नव्हतं."
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला (Indian Team) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यात 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची आघाडीचे तीन खेळाडू-रोहित शर्मा, के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली प्रत्येकी 1 धाव करत बाद झाले. मधली फळी देखील साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरले. पण, माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी आपल्या सावध पण आक्रमक खेळीने भारताचा डाव सावरला. पण, धोनी आणि जडेजा ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाले. धोनी आणि जडेजा यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. (टीम इंडिया ला मागे टाकत रोहित शर्मा, पत्नी रितिका आणि लेक समायरा सह मुबंईत परतला, पहा Photos)
बॉम्बे टाइम्सशी बोलताना जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) यांनी सामन्यानंतर जडेजाची मनस्थिती कशी होती याबद्दल माहिती दिली आहे. रिवाबा म्हणाली की, की, "पराभवानंतर त्याचं रडणं थांबत नव्हतं तो सतत बडबडत होता की मी आउट झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो. जेव्हा तुम्ही विजयाच्या इतक्या जवळ येता आणि पराभव होतो तेव्हा त्रास होतो. यातून सावरण्यासाठी वेळ लागेल."
केवळ जडेजाच नव्हे तर संपूर्ण देशाचे देखील एकच मत आहे. धोनी आणि जडेजा अजून काळ मैदानावर टिकून राहिले असते तर सामन्याचा निर्णय भारताच्या बाजून लागला असता. दरम्यान, सेमीफायनलमधील सामन्यात जडेजाच्या खेळीची त्याला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला होता.