Ranji Trophy: कर्नाटकविरुद्ध मॅचसाठी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ यांना मुंबई टीममध्ये स्थान; अशोक डिंडा याला बंगाल संघातून वगळले

दुसरीकडे, बंगालने अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याला गुजरातविरुद्ध रणजी करंडक एलिट गट ‘अ’ सामन्यासाठी सोमवारी जाहीर केलेल्या 16 सदस्यीय संघात स्थान दिले नाही.

अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ (Photo Credit: Getty Images)

भारतीय टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि युवा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांना कर्नाटक (Karnataka) विरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यासाठी मुंबईच्या (Mumbai) 15 सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी या दोघांनी बरोडा आणि रेल्वेविरुद्ध सामने खेळले आहेत. शॉने बडोद्याविरुद्ध द्विशतक झळकावले ज्यामध्ये संघाने विजय मिळवला. पण, रेल्वेविरुद्ध दोन्ही डावांमध्ये तो अपयशी ठरला आणि रेल्वेने या सामन्यात 41 वेळा चॅम्पियनला 10 गडी राखून पराभूत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर 63 टेस्ट सामने खेळणार्‍या रहाणेला या दोन्ही सामन्यात फलंदाजीद्वारे समाधान कारक कामगिरी करता आली नाही. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या वेबसाईटवर 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून यामध्ये या दोन्ही खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांचा पुन्हा संघात समावेश झाला नाही. तिघांचाही श्रीलंकाविरुद्ध टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकविरुद्ध सामना वांद्रे कुर्ला संकुलात 3 जानेवारीपासून खेळला जाईल. (Ranji Trophy 2019-20: अंपायरने चुकीचं आऊट दिल्यावर चिडला युसुफ पठाण, अजिंक्य रहाणे सह मैदानातच भिडला, पाहा Video)

दुसरीकडे, बंगालने (Bengal) अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा (Ashok Dinda) याला गुजरात (Gujarat) विरुद्ध रणजी करंडक एलिट गट ‘अ’ सामन्यासाठी सोमवारी जाहीर केलेल्या 16 सदस्यीय संघात स्थान दिले नाही. आंध्र प्रदेशविरुद्ध सामन्यापूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक रणदेव बोस यांच्याशी ‘गैरवर्तन’ केले आणि त्यानंतर त्याने माफी मागण्यास नकार दिला, ज्यामुळे डिंडाला संघातून वगळण्यात आले. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या सुदीप चटर्जी याच्या जागी नवीन डावखुरा फलंदाज काझी जुनैद सैफीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे मुंबई आणि बंगाल संघ:

मुंबई संघ: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, सरफराज खान, शुभम रंजन, आकाश पारकर, सिद्धेश लाड, शम्स मुलांनी, विनायक भोईर, शशांक अत्तरडे, रोस्टन डायस, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी आणि एकनाथ केरकर.

बंगाल संघ: अभिमन्यू एस्वरन (कॅप्टन), अभिषेक रमण, मनोज तिवारी, अनस्तूप मजुमदार, श्रीवत गोस्वामी, अर्णब नंदी, रित्विक रॉय चौधरी, ईशान पोरेल, शाहबाझ अहमद, सुदीप घरमी, आकाश दीप, मुकेश कुमार, कौशिक घोष, बी अमित, अयान भट्टाचार्य आणि काझी जुनैद सैफी.