SRH vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सच्या मदतीला धावून आले राहुल तेवतिया-रियान पराग; SRHवर 5 विकेटने मात करत मोडली पराभवाची मालिका

सनरायजर्सने आजच्या सामन्यात 4 विकेट गमावून 158 धावा केल्या आणि रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले होते. अशा स्थितीत राहुल तेवतिया-रियान परागच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल्सने चार पराभवानंतर 5 विकेटने विजय मिळवला.

राहुल तेवतिया-रियान पराग (Photo Credit: Twitter/IPL)

SRH vs RR, IPL 2020: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) आयपीएलच्या (IPL) 26व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) थरारक विजय मिळवला आणि सलग पाचवा पराभव टाळला. मनीष पांडेच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्सने आजच्या सामन्यात 4 विकेट गमावून 158 धावा केल्या आणि रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले होते. अशा स्थितीत राहुल तेवतिया (Rahul Tewatia)-रियान परागच्या (Riyan Parag) अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल्सने चार पराभवानंतर 5 विकेटने विजय मिळवला. दरम्यान, आजच्या सामन्यात रॉयल्सच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पण तेवतिया आणि रियानच्या फटकेबाजीने मोक्याच्या क्षणी सामन्यात रंगात आणली. तेवतिया आणि परागला वगळता एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. संजू सॅमसनने 26, रॉबिन उथप्पाने 18 आणि जोस बटलरने 16 धावांचे योगदान दिले. तेवतिया 45 आणि रियान 42 धावा करून नाबाद परतले. राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधील हा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे, सनरायजर्ससाठी खलील अहमद आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (SRH vs RR, IPL 2020: मनीष पांडेचे धडाकेबाज अर्धशतक, हैराबाद समोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य)

159 वांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने जोस बटलरसह बेन स्टोक्सला सलामीला पाठवले. मात्र, 6 चेंडूत 5 धावा करून तो बाद झाला. स्वतः कर्णधार स्मिथ देखील 5 धावांवर बाद झाला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्मिथला विजय शंकरने धावबाद केले. तिसरा धक्का राजस्थानला बटलरच्या रूपात आला जो 16 धावांवर खलीलचा शिकार बनला. रशीदच्या फिरकीसमोर रॉबिन उथप्पा देखील अपयशी ठरला आणि 18 धावांवर माघारी परतला. संजू सॅमसनने 26 धावा केल्या आणि बेअरस्टोकडे रशीदच्या चेंडूवर झेलबाद झाला. रॉयल्सने 78 धावांवर 5 विकेट गमावले असताना तेवतिया आणि परागच्या जोडीने रॉयल्सला विजयीरेषा ओलांडून दिली. या दोन्ही फलंदाजांनी चौकार आणि षटकार ठोकत हैदराबादकडून सामना खेचून काढला.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्सला बॅटिंगने संघर्ष करावा लागला. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक 54, तर करणदाहर डेविड वॉर्नर 48 धावा करून आऊट झाला. केन विल्यमसनने 12 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. रॉयलसाठी आजच्या सामन्यातून बेन स्टोक्सने पदार्पण केले, पण तो बॅट आणि त्यापूर्वी चेंडूने काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. स्टोक्सने 1 ओव्हर टाकली आणि 7 धावा दिल्या.



संबंधित बातम्या

Australia vs India 4th Test Day 4 Preview: टीम इंडिया चौथ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करणार की ऑस्ट्रेलीयन गोलंदाज मोठा पलटवार करणार? खेळपट्टी अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती जाणून घ्या

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुट्ट्यांचा वर्षाव; बँक कामांचे आताच करा नियोजन, जाणून घ्या हॉलिडे लिस्ट

India vs England T20I Series 2024: टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून टी 20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार; जाणून घ्या सर्व सामने कधी आणि कुठे खेळले जाणार?

New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स