‘IPL खेळतोस, PSL ला नकार का?’ पाकिस्तानी चाहत्याने विचारला प्रश्न, न्यूझीलंडच्या जिमी नीशमच्या झकास उत्तराने केलं बोलती बंद
नीशमने चाहत्याला झकास उत्तर दिलं आणि त्याची बोलती बंद केली. चाहत्याने नीशमला विचारले, “जिमी नीशम तुम्ही आयपीएल खेळत आहात पण पीएसएल का नाही? आयपीएल आपल्याला अधिक पैसे आणि प्रसिद्धी देते म्हणूनच आपण पीएसएलमध्ये खेळत नाही. फार खेद.”
जेम्स नीशम (James Neesham) न्यूझीलंडच्या मर्यादित ओव्हर संघांचा महत्वपूर्ण सदस्य आहे आणि ब्लॅक कॅप्सने 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यामागे एक प्रमुख कारण होता. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा सामना खेळेल नीशम इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2020 आवृत्तीत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून (Kings XI Punjab) खेळताना दिसेल. यापूर्वी, तो 2014 मध्ये आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) कडून चार सामने खेळला होता. यादरम्यान, एका चाहत्याने त्याला आयपीएलमध्ये (IPL) खेळण्याबद्दल आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) न खेळण्याबद्दल प्रश्न विचारला. नीशमने चाहत्याला झकास उत्तर दिलं आणि त्याची बोलती बंद केली. चाहत्याने नीशमला विचारले आणि लिहिले, “जिमी नीशम तुम्ही आयपीएल खेळत आहात पण पीएसएल (PSL) का नाही? आयपीएल आपल्याला अधिक पैसे आणि प्रसिद्धी देते म्हणूनच आपण पीएसएलमध्ये खेळत नाही. फार खेद.” (IPL 2020: आयपीएलमधील एका संघाच्या 2 खेळांडूसह 13 जणांना कोरोनाची लागण; बीसीसीआयची माहिती)
यावर नीशमने आपल्याच अंदाजात उत्तर दिलं. नीशमने चाहत्याला उत्तर दिलं आणि लिहिलं की, “किंवा पीएसएलचे आयोजन न्यूझीलंडच्या उन्हाळ्याच्या मध्यभागी असते हेदेखील कारण असू शकतं.” आयपीएल आणि पीएसएलमध्ये सुरुवातीपासून तुलना होत आली आहेत.
आयपीएलच्या लिलावात पंजाबने नीशमला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर विकत घेतले. यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे, परंतु अद्याप तो स्पर्धेत आपला ठसा उमटवू शकलेला नाही. केएल राहुलच्या नेतृत्वात नीशम किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आजवर आपल्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय 12 टेस्ट, 63 वनडे आणि 18 टी-20सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय कसोटीत 709, वनडे सामन्यात 1286 आणि टी-20 मध्ये 185 धावा केल्या आहेत. याशिवाय कसोटी सामन्यात 14, वनडे सामन्यात 61 आणि टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13 बळी आहेत.