PCB च्या नवीन केंद्रीय कराराच्या यादीतून 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार सरफराज अहमद याचं डिमोशन होण्याची शक्यता

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधार सरफराज अहमद याला नवीन केंद्रीय करारामध्ये ‘अ’श्रेणीतून ‘सी’श्रेणीत वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये नवीन केंद्रीय कंत्राट खेळाडूंना देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पीसीबीने केवळ 19 खेळाडूंना केंद्रीय कंत्राट दिले होते.

Sarfaraz Ahmed (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला नवीन केंद्रीय करारामध्ये ‘अ’श्रेणीतून ‘सी’श्रेणीत वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये नवीन केंद्रीय कंत्राट खेळाडूंना देण्यात येणार आहेत. तपशिलानुसार कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असूनही खेळाडूंच्या केंद्रीय रिटेनर फी किंवा मॅच फी कमी करण्याच्या विरोधात बोर्डाने निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पीसीबीने (PCB) केवळ 19 खेळाडूंना केंद्रीय कंत्राट दिले होते ज्यात त्यांनी मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्यासारख्या वरिष्ठांना वगळले होते. बोर्डाच्या धोरणात्मक निर्णयानुसार करारबद्ध खेळाडूंची संख्या 32 वरून 19 पर्यंत कमी करण्यात आली होती. त्या यादीत सरफराजला बाबर आझम आणि यासिर शाहसमवेत ए श्रेणीत ठेवले गेले होते कारण त्यावेळी तो तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार होता. (क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन केंद्रीय कराराची केली घोषणा; मार्नस लाबूशेन In, उस्मान ख्वाजा Out, पाहा पूर्ण लिस्ट)

नोव्हेंबरमध्ये निवड समितीने केवळ यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून नाही तर सरफराजला कर्णधार म्हणूनच आणि तिन्ही फॉर्मेट्समधून खेळाडू म्हणूनही वगळले. पीटीआयमध्ये नमूद केल्यानुसार पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, “सध्या नवीन कंत्राटांमध्ये सरफराजला सीश्रेणीत स्थान देण्यात आले आहे.” दरम्यान, सूत्रांनी सांगितले की अबीद अलीला ब वर्गात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, तर त्याचे सहकारी कसोटी सलामी फलंदाज शान मसूद आणि हसन अली करार गमावू शकतात.

पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान, डायरेक्टर आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स झाकीर खान आणि मुख्य प्रशिक्षक व मुख्य निवडक मिसबाह-उल-हक यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत करार केलेल्या खेळाडूंची नवीन यादी निश्चित केली जात आहे. मागील केंद्रीय करारामध्ये बोर्डाने कायमस्वरुपी धारकांची संख्या 25 ते 40 टक्क्यांनी वाढविली होती आणि कोरोना व्हायरस व जगात सर्वत्र लॉकडाऊन असूनही पीसीबी समिती टेस्ट सामन्यावरील शुल्क वाढविण्याबाबत विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंमध्ये हे समाविष्ट आहे:

अ श्रेणी: बाबर आझम, सरफराज अहमद आणि यासीर शाह.

बी श्रेणी: अजहर अली, हारिस सोहेल, इमाम-उल-हक, असद शफीक, मोहम्मद अब्बास, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि वहाब रियाज.

सी श्रेणी: शान मसूद, फखर जमान, मोहम्मद आमिर, आबिद अली, मोहम्मद रिजवान, हसन अली, उस्मान शिनारी आणि इमाद वसीम.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

IND vs PAK Champion Trophy 2025: कुलदीप बाहेर, चक्रवर्ती आत, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची अशी असून शकते संभाव्य प्लेइंग 11

AUS vs ENG 4th Match Scorecard: बेन डकेट ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर पडला तुटून, झळकावले ऐतिहासिक शतक; कांगारुसमोर 352 धावांचे लक्ष्य

IND vs PAK, Champions Trophy 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवरील प्रसारण कसे पहाल?

IND vs PAK Champion Trophy 2025: दुबईच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तानचा कसा आहे रेकाॅर्ड? वाचा एका क्लिकवर

Share Now