PBKS vs SRH IPL 2021: चेपॉकवर सनरायझर्सच्या पराभवाची मालिका खंडित, पंजाबवर 9 विकेटने मात करत नोंदवला पहिला विजय
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात पंजाब किंग्सने दिलेल्या 121 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 9 विकेटने एकतर्फी विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आजच्या सामन्यात विजयासह हैदराबादने यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला विजय मिळवला आहे.
PBKS vs SRH IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 121 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 9 विकेटने एकतर्फी विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आजच्या सामन्यात विजयासह हैदराबादने यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील देखील डेविड वॉर्नरच्या सनरायझर्सचा हा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी या मैदानावर खेळण्यात आलेल्या समन्यात संघाला पराभवाची चव चाखावी लागली आहे. संघाच्या पहिल्या विजय कर्णधार वॉर्नरने 37 धावा केल्या तर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 63 नाबाद धावा आणि यंदा आपला पहिलाच सामना खेळणारा केन विल्यमसन (Kane Williamson) 16 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, पंजाबसाठी फलंदाजांनानंतर चेंडूने देखील खेळाडूंनी निराशा केली. फॅबियन अॅलनला एकमात्र विकेट मिळाली. (हृदयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर Muttiah Muralitharan यांना लवकरच रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज)
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या पंजाबने दिलेल्या 121 धावांच्या माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादसाठी पुन्हा कर्णधार वॉर्नर आणि बेयरस्टोच्या सलामी जोडीने मजबूत सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी पावर प्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर हे दोघे घातक फलंदाज संघाला विजयाची रेष ओलांडून देतील असे दिसत असताना पंजाबचा पदार्पणवीर अॅलनने हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला मयंक अग्रवालकडे झेलबाद केले. अखेरीस आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या विल्यमसनने जॉनी बेयरस्टोच्या साथीने संघाला पहिला विजय मिळवून दिला. यापूर्वी चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सनरायझर्स संघाला कोलकाता, बेंगलोर आणि मुंबईकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आपल्या चौथ्या सामन्यात विजय मिळत हैदराबाद संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद करत गुणतालिकेत खातं उघडलं आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी मात केली, तथापि पुढे चेन्नई आणि मग दिल्लीने त्यांना धूळ चारली. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर हैदराबादच्या गोलंदाजांसमोर पंजाब किंग्सने लोटांगण घातलं. पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ 19. 4 ओव्हरमध्ये 120 धावांवर ऑलआऊट झाला. पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि शाहरुख खानने प्रत्येकी 22 धावा केल्या, तर सनरायझर्सकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. खलीलने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत 3 गडी बाद केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)