PBKS vs SRH IPL 2021: केएल राहुलने जिंकला टॉस, पंजाब किंग्स करणार पहिले बॅटिंग; या मराठमोळ्या अष्टपैलूने झाले SRH डेब्यू

आजचा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे.

डेविड वॉर्नर आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

PBKS vs SRH IPL 2021: आयपीएलच्या (IPL) 14 व्या सामन्यात आज डेविड वॉर्नरचे (David Warner) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि केएल राहुलचे (KL Rahul) पंजाब किंग्स (PUnjab Kings) आमनेसामने येणार आहेत. आजचा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. हैदराबादसाठी केन विल्यमसन (Kane Williamson) इलेव्हनमध्ये परतला असून मराठमोळ्या केदार जाधवला (Kedar Jadhav) डेब्यूची संधी मिळाली आहे. शिवाय, मनीष पांडे, अब्दुल समद आणि मुजीब उर रहमान यांना बाहेर केले आहे. यांच्या जागी सिद्धार्थ कौल, विल्यमसन आणि केदारचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघात देखील दोन बदल झाले आहेत. पंजाबने आजच्या सामन्यातून फेबियन अ‍ॅलन (Fabian Allen) आणि मोइसेस हेनरिक्स (Moises Henriques) यांना पदार्पणाची संधी दिली आहे. (IPL 2021 Points Table Updated: मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप)

सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल 2021 ची सुरुवात काही अपेक्षेनुसार झाली नाही. चेपॉक स्टेडियमवर खेळलेल्या तीनही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे धावांचा पाठलाग करताना तीनही वेळा त्यांचा पराभव झाला आहे. त्यांना त्यांच्या मधल्या फळीतील गोंधळ सोडवण्याची गरज आहे. तेच लक्षात घेत त्यांनी विल्यमसन आणि जाधवचा समावेश केला आहे. दुसरीकडे, मागील सामन्यातील पराभव मागे टाकत पंजाब किंग्स पुन्हा विजयाने सुरुवात करू इच्छित असतील. यापूर्वी दोन्ही संघात 16 सामने खेळवण्यात आले आहेत ज्यामध्ये हैदराबाद वरचढ राहिली आहे. हैदराबादने 11 तर पंजाबने 5 वेळा सनरायझर्सवर मात केली आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हनः डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), केन विल्यमसन, विराट सिंह, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल.

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हनः केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, शाहरुख खान, फॅबियन अ‍ॅलन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह