PBKS vs RCB IPL 2021 Match 26: विराट कोहलीने जिंकला टॉस, पंजाब करणार पहिले बॅटिंग; जाणून घ्या Playing XI

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला पहिले बॅटिंग करण्यास सांगितले आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तर पंजाब संघात 3 बदल झाले आहेत.

विराट कोहली आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

RCB vs PBKS IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 26व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात झुंज रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला पहिले बॅटिंग करण्यास सांगितले आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाझ अहमदचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंजाब संघात 3 बदल झाले आहेत. मयंक अग्रवाल दुखापतीमुळे बाहेर बसला आहे तर हेनरिक्स हेनरिक्स आणि अर्शदीप सिंहच्या जागी रिले मेरीडिथ, हरप्रीत ब्रारला संधी मिळाली आहे. मयंकच्या जागी पंजाबने प्रभसिमरन सिंहचा समावेश केला आहे. (IPL 2021: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या Adam Zampa चे वादग्रस्त विधान, म्हणाला- ‘आयपीएलसाठी तयार केलेले बायो-बबल सर्वात असुरक्षित’)

पंजाबला या मोसमात आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही तर बेंगलोरने मागील वर्षीच्या आपल्या कामगिरीत मोठी सुधारणा करत आघाडीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पंजाबने आतापर्यंत 6 पैकी 2 सामन्यात विजयाची नोंद केली आहे तर बेंगलोरने 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीला आतापर्यंत चेन्नईकडून एकमेव पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबचे गोलंदाज समाधानरकारक कामगिरी करत आहेत मात्र, फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. क्रिस गेल व कर्णधार राहुलला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे, विराट कोहली, देवदत्त पडिक्क्ल, एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलवर आरसीबीच्या फलंदाजीची भिस्त आहे. गोलंदाजी विभागात हर्षल पटेल सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय तर मोहम्मद सिराज त्याला चांगली साथ देत आहे. दुसरीकडे, पंजाबचे गोलंदाज देखील विकेटसाठी संघर्ष करताना दिसले आहेत.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), क्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंह, रिले मेरीडिथ, शाहरुख खान, झे रिचर्डसन, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार आणि रवी बिश्नोई.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन). देवदत्त पडिक्क्ल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.