Pat Cummins Hat-Trick: पॅट कमिन्सने इतिहास रचला, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

स्टार वेगवान गोलंदाजाने प्रथम विरोधी संघाचा कर्णधार राशिद खानला 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिडकडून झेलबाद केले.

Pat Cummins (Photo Credit - X)

AFG vs AUS: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात दोनदा हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने प्रथम बांगलादेशविरुद्ध चालू हंगामात ही कामगिरी केली. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा हॅट्ट्रिक घेत संपूर्ण जगाला चकित केले आहे. स्टार वेगवान गोलंदाजाने प्रथम विरोधी संघाचा कर्णधार राशिद खानला 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिडकडून झेलबाद केले. त्यानंतर डावातील 20 वे षटक टाकत असताना पहिल्याच चेंडूवर करीम जन्नत बाद झाला. जन्नतलाही टीम डेव्हिडने झेलबाद केले. कमिन्स इथेच थांबला नाही. त्याने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर गुलबदिन नायबला ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्यास भाग पाडले. नायब ग्लेन मॅक्सवेलला झेल देवू बाद झाला.

पाहा व्हिडिओ

अफगाणिस्तानविरुद्ध कमिन्सची गोलंदाजी कशी होती?

अफगाणिस्तानविरुद्ध पॅट कमिन्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर त्याने संघासाठी एकूण 4 षटके टाकली. दरम्यान, तो 7.00 च्या इकॉनॉमीमध्ये 28 धावा देत 3 विकेट घेण्यात यशस्वी झाला. रशीद खान, करीम जन्नत आणि गुलबदिन नायब हे त्यांचे बळी होते. (हे देखील वाचा: Afghanistan Players Dance Video: ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा ड्वेन ब्राव्होसोबत 'चॅम्पियन' गाण्यावर डान्स, पाहा व्हिडिओ)

अफगाणिस्ताकडून ऑस्ट्रेलियाचा लाजीरवाणा पराभव 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या आहेत. संघाच्या डावाची सुरुवात करताना गुरबाज (60) आणि इब्राहिम झद्रान (51) चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने संघ दीडशे धावांतच अडकला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 127 धावावर गारद झाला.