SRH vs MI, IPL 2024 8th Match Head To Head: हैदराबादच्या मैदानात पांड्या-पॅट कमिन्स आमनेसामने, पाहा हेड टू हेड आकडेवारी
पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने केकेआरविरुद्धचा सामनाही विजयाच्या स्थितीतून गमावला.
SRH vs MI, IPL 2024 8th Match: सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांना आयपीएल 2024 च्या (IPL 2024) सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा विजयाची नोंद करून आपले खाते उघडण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने केकेआरविरुद्धचा सामनाही विजयाच्या स्थितीतून गमावला. (हे देखील वाचा: SRH vs MI, IPL 2024 8th Match Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
पाहा दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड
जर आपण मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांच्या हेड टू हेड आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यात मुंबईचा वरचष्मा आहे. मुंबईने 12 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने जिंकले होते.
दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुल्तानी , नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, टिळक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव.
सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को यान्सन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जथवेध सुब्रमण्यम.