फहिम अशरफ याला हसन अली याच्या लग्नासाठी व्हिसा मंजूर होण्याबाबत साशंकता; अलीने दिले मजेदार प्रत्युत्तर

हसनच्या या ट्विटवर फहीम अशरफ यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, त्यांनी भारतीय व्हिसाबाबत मंजूर होण्यासाठी काम करण्यास सुरवात केली आहे.

हसन अली (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तानच जलद गोलंदाज हसन अली (Hasan Ali) हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील शामिया आरझू (Shamia Arzoo) सोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा काल दिवसभर सुरु होत्या. पण, अलीने याबाबाद स्पष्टीकरन देत म्हणाल की, त्यांचं लग्न अजून ठरलं नाही आणि दोन्ही घरातील कुटुंबियांची भेट व्हायची आहे. ट्विटरवर याबाबाद माहिती देत हसन म्हणाला,'' माझं लग्न अजून ठरलेलं नाही. आमचे कुटुंबातील सदस्य अजून एकमेकांना भेटलेले नाहीत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.'' शामिया सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर पदावर रुजू आहे. आणि दोघांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडणार आहे. (सानिया मिर्झानंतर आणखी एक भारतीय होणार पाकिस्तानची सून, क्रिकेटपटू हसन अली सोबत अडकणार विवाहबंधनात)

दरम्यान, हसनच्या या ट्विटवर फहीम अशरफ (Faheem Ashraf) यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, त्यांनी भारतीय व्हिसाबाबत मंजूर होण्यासाठी काम करण्यास सुरवात केली आहे. अशरफने शादाब खान (Shadab Khan) यालाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केले. यावर अलीने प्रत्युत्तर देत सांगितले की सर्व गोष्टी व्यवस्थित ठरू द्या. एका भारतीय मूळच्या मुलीशी लग्न करणारा हसन हा पहिला क्रिकेटपटू होणार नाही. शोएब मलिक, झहीर अब्बास आणि मोहसीन हसन खान यांच्या पत्नी देखील भारतीय मूळच्या आहेत.

हसन अली भारतीयांच्या देखील लक्षात राहण्यासारखा आहे. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असताना अचानक हसनने आपल्या विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. विकेट घेतल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून त्याने केले होते.