Pakistan vs England 3rd Test 2024 Playing 11: अंतिम कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन जाहीर, फिरकी गोलंदाजांवर दिला भर; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

आता तिसरा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.

PAK vs ENG (Photo Credit- X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 3rd Test 2024: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 24 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना रावळपिंडीत होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने एका डावाने जिंकला, तर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. (हे देखील वाचा: Pakistan vs England 3rd Test 2024 Live Streaming: तिसऱ्या कसोटीत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत, विजेता संघ करणार मालिकेवर कब्जा; सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमींग कसे पाहाल घ्या जाणून)

पाकिस्तानकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही

पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसऱ्या सामन्यात खळबळ माजवणारा फिरकी गोलंदाज साजिद खानलाही संधी देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय नोमान अली हा देखील प्लेइंग इलेव्हनचा एक भाग आहे. नोमान आणि साजिद यांनी मिळून इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. दोघांनी आपल्या नावावर 20 विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा

इंग्लंडनेही शेवटच्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केले होते. इंग्लंडनेही आपल्या खेळात मोठा बदल केला आहे. पाहुण्या संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. फिरकी विकेटनुसार व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. रेहान अहमदचेही संघात पुनरागमन झाले आहे. तिसरा सामना जिंकून इंग्लंड क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे आपले लक्ष केंद्रित करणार आहे.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

सायम अय्युब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर.