PAK vs WI: बाबर आझमच्या शतकी वादळात ‘विराट’ रेकॉर्ड स्वाहा, असा कारनामा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला

या खेळीच्या जोरावर त्याने कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. या शतकासह इतिहास रचण्यासोबतच पाकिस्तानी कर्णधाराने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रमही उद्ध्वस्त केला आहे.

विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

Babar Azam Breaks Virat Kohli Record: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) वनडे कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. बुधवार, 8 जून रोजी मुल्तान (Multan) क्रिकेट स्टेडियमवर निकोलस पूरनच्या वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात तरुण फलंदाजाने ही कामगिरी केली. जानेवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेदरम्यान कोहलीने त्याच्या 17व्या डावात हा पराक्रम केला. तर बुधवारच्या सामन्यापूर्वी बाबरला कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी 98 धावांची गरज होती आणि त्याच्याकडे चार डावांची संधी होती. मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात आजमने कोहलीला मागे टाकले. पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार म्हणून 13 डावांमध्ये 27 वर्षीय खेळाडूने 91.36 च्या सरासरीने आणि 103.71 च्या स्ट्राइक रेटने सहा शतके आणि 3 अर्धशतकांसह 1005 धावा केल्या आहेत. (Virat Kohli 200 Million Followers: विराट कोहलीचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; ठरला 200 मिलिअन फॉलोअर्स असणारा पहिला क्रिकेटर)

या यादीत एबी डिव्हिलियर्स (18), केन विल्यमसन (20) आणि अॅलिस्टर कुक (21) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इतकेच नाही तर या शतकी खेळीसह बाबर आजमने इतिहास रचत वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. बाबरचे वनडे क्रिकेटमधील हे सलग तिसरे शतक आहे. वेस्ट इंडिजपूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग शतके झळकावली होती. त्याच वेळी, त्याने 2016 मध्ये कॅरेबियन संघाविरुद्ध तीन वेळा सलग 100 हून अधिक धावा करताना शतकांची हॅटट्रिक केली होती. दरम्यान, कॅरेबियन संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, बाबरने 107 चेंडूत नऊ चौकारांसह 103 धावा केल्या आणि यजमान संघाच्या झोळीत पाच गडी राखून विजय पाडला.

दबावाखाली 23 चेंडूत नाबाद 41 धावा करणाऱ्या खुशदिल शाहने सामनावीराचा पुरस्कार जिंकला असून बाबरनेही त्याचे कौतुक केले. लाहोरमध्ये जन्मलेला बाबर सध्या एकदिवसीय आणि टी-20 मध्ये नंबर 1 फलंदाज आहे. 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये या तरुणाने 59.78 च्या सरासरीने आणि 90.42 च्या स्ट्राइक रेटने 17 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4364 धावा केल्या आहेत. दरम्यान सध्या सुरू असलेल्या मालिकेतील दुसरा वनडे सामना शुक्रवार, 10 जून रोजी मुलतान येथे त्याच मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सलामीवीर शे होपच्या शतकाच्या जोरावर 305 धावांपर्यंत मजल मारली तरी पाकिस्तानने लक्ष्य 4 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.