PAK vs SL 2nd Test: बाबर आझम, अझर अली, अबिद अली आणि शान मसूद यांनी शतकं ठोकत केली भारताच्या विश्व रेकॉर्डची केली बरोबरी, वाचा सविस्तर

2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध शतकं करणारा भारताचे वसीम जाफर, दिनेश कार्तिक, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे पहिलेच होते.

बाबर आझम, अझर अली, अबिद अली आणि शान मसूद (Photo Credit: Twitter/TheRealPCB)

श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध कराची स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) चौथ्या दिवशी 475 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानचा सलामी फलंदाज शान मसूद (Shan Masood) याने 135 धावा केल्या तर अबिद अली (Abid Ali) याने दुसरे सलग शतक ठोकत 174 धावा केल्या आणि तिसर्‍या दिवशी तिसऱ्या विकेटसाठी 278 धावांची भागीदारी केली. मसूदच्या बाद झाल्यानंतर नवनियुक्त कसोटी कर्णधार अझर अली (Azhar Ali) याने स्वरूपात आपले 16 वे शतक झळकावले. अझरने 118 धावा केल्या. त्यानंतर 25 वर्षांचा बाबर आझम (Babar Azam) आला, ज्याने एक सत्र आणि 3 तासांपेक्षा कमी वेळात 131 चेंडूत शतक झळकावले आणि यानंतर पाकिस्तानने डाव घोषित केला. यासह पाकिस्तानने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्या नावांची नोंद केली आहे. खेळाच्या या प्रदीर्घ स्वरूपात पहिली 4 फलंदाजांनी शतकं ठोकण्याची ही फक्त दुसरी वेळ आहे. 2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध शतकं करणारा भारताचे (India) वसीम जाफर, दिनेश कार्तिक, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे पहिलेच होते. (PAK vs SL 1st Test: आबिद अली याचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे नंतर टेस्ट डेब्यू मॅचमध्ये ठोकले शतक करणारा बनला पहिला क्रिकेटपटू)

भारतीय संघाच्या चार फलंदाजांनी बांग्लादेशविरूद्ध हा पराक्रम करत विश्वविक्रम केला होता. आणि आता पाकिस्तानच्या पहिल्या चार फलंदाज-मसूदने 135 धावा, आबिद 174, कर्णधार अझहर 118 आणि बाबरने नाबाद 100 धावांची खेळी करत 12 वर्षांपूर्वी बनलेल्या भारताच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. भारताकडून कार्तिक ने 129 धावा, वसीम ने नाबाद 139, द्रविडने 129 आणि सचिनने नाबाद 122 धावांचा डाव खेळत बांग्लादेशविरुद्ध हा विश्व रिकॉर्ड बनविला होता.

या क्षणी या मॅचबद्दल बोलताना, श्रीलंकाला एकूण 120 ओव्हरमध्ये 476 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहेत. पाकिस्तानला विजयासाठी 10 विकेटची गरज आहे. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकेल. मालिकेचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत पाकिस्तान संघ 191 धावांवर ऑल आऊट झाला. याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकाने पहिल्या डावात 271 धावा केल्या आणि 80 धावांची आघाडी घेतली. पण पाकिस्तानने दुसर्‍या डावात फक्त तीन विकेट गमावत 555 धावा केल्या आणि 475 धावांची आघाडी मिळवून डाव घोषित केला.