PAK vs ENG 2nd Test Day 2 Live Streamig: दुसऱ्या दिवसाचा खेळाला लवकरच होणार सुरुवात, येथे जाणून घ्या लाइव्ह सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. हा महत्वाचा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या इंग्लंड संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. हा महत्वाचा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या इंग्लंड संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाला हा विजय मिळवून मालिकेत विजयाची नोंद करायची आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 90 षटकांत 5 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी पाकिस्तानकडून कामरान गुलामने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. सध्या पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान 37 धावांवर आणि आगा सलमान 5 धावांवर नाबाद आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की, सामन्याला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.
पाकिस्तान : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)