India vs England 2021 Live Broadcast: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येणार? घ्या जाणून
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी मालिकेला येत्या शुक्रवारपासून (5 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे.
India vs England 2021: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामिगिरी करणारा भारतीय संघ आता मायदेशात इंग्लंडसोबत भिडणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी मालिकेला येत्या शुक्रवारपासून (5 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. परंतु, या मालिकेतील सामने कोणत्या वाहिनीवर प्रसारीत केले जातील? असा प्रश्न सर्वांना पडला होता. दरम्यान, चॅनेल फोरला (Channel 4) प्रसारण अधिकार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटेन येथील एशेज मालिकेनंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका चॅनेल फोरवर पहिल्यांदाच पाहता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेचे फ्री टू एअर प्रसारण केले जाणार आहे.
ब्रिटिश माध्यामांच्या वृत्तानुसार, चॅनल फोर तब्बल 15 वर्षानंतर इंग्लंडच्या कसोटी सामन्यांचे प्रसारण करणार आहे. याशिवाय, फ्री टू एअर वाहिन्यांवर दाखवले जाणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही देशात परत आले आहे. लॉकडाऊन दरम्यान, चॅनेल फोर टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 1st Test 2021: युवा मोहम्मद सिराज की अनुभवी इशांत शर्मा? इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वेगवान गोलंदाज निवडीचा भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला आणि दुसरा कसोटी सामना चेन्नई मैदानात खेळण्यात येणार आहे. पहिला सामना 5-9 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. तर, दुसरा सामना 13-17 फेब्रुवारी पार पडणार आहे. हे दोन्ही सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास होणार आहे. तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथे 24-28 फेब्रुवारी डे-नाईट खेळला जाणार आहे. चौथा आणि अखेरचा सामना 4-8 अहमदाबाद येथे होणार आहे.
चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा परडा जड राहिला आहे. चेन्नईत आतापर्यंत झालेल्या 32 पैकी 14 कसोटी भारतीय संघाने विजय मिळवला आहे. सहा सामन्यात पराभव झाला तर, 11 सामने ड्रॉ झाले आहेत. या शिवाय चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटी विजय मिळवला आहे.