IPL 2021 लिलावात अनसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंड फलंदाज Devon Conway याची स्फोटक खेळी, AUS विरुद्ध 59 चेंडूत केल्या तुफान 99 धावा
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या मोसमासाठीच्या लिलावात न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवेला एकही खरेदीदार सापडला नाही. आयपीएलचा लिलाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात कॉनवेने आपल्या बॅटने मोठा दणका दिला आणि स्फोटक डाव खेळला. कॉन्वेने कांगारू संघाविरुद्ध फक्त 59 चेंडूत 99 धावांची शानदार नाबाद खेळी केली.
NZ vs AUS 1st T20I 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या मोसमासाठीच्या लिलावात न्यूझीलंडचा (New Zealand) फलंदाज डेव्हन कॉनवेला (Devon Conway) एकही खरेदीदार सापडला नाही. आयपीएल लिलावात डेव्हन कॉनवेची बेस प्राईस 50 लाख होती. किवी फलंदाजाला संघात समाविष्ट करण्याची इच्छा कोणत्याही फ्रेंचायजीने व्यक्त केली आणि आता त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरत आहे. आयपीएलचा लिलाव (IPL Auction) संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात कॉनवेने आपल्या बॅटने मोठा दणका दिला आणि स्फोटक डाव खेळला. कॉन्वेने कांगारू संघाविरुद्ध फक्त 59 चेंडूत 99 धावांची शानदार नाबाद खेळी केली, ज्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या टी-20 सामन्यात 53 धावांनी दमदार विजय मिळवला. कॉनवेने 99 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि तीन उतुंग षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज किवी फलंदाजासमोर पूर्णपणे असहाय्य दिसत होते आणि धावांचा वेग रोखण्यात अपयशी ठरले. (NZ vs AUS 1st T20I: आयपीएल लिलावात 14 कोटीची कमाई करणारा Glenn Maxwell 1 धाव करून आऊट, विराटच्या RCB ची नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, पहा Tweets)
कॉनवेच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 184 धावा केल्या. यजमान संघाने एकावेळी 19 धावांवर 3 विकेट गमावले असताना कॉन्वेची जबरदस्त खेळीने किवी संघाची लाज राखली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कॉनवे व्यतिरिक्त ईश सोधीने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने चार ओव्हरमध्ये केवळ 28 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यातील विजयासह पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. किवी संघाने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा प्रत्युत्तरात ऑस्ट्रि संघ 131 धावांवर ऑलआऊट झाला.
185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची देखील सुरुवात खराब झाली आणि संघाने आपले पहिले चार विकेट केवळ 19 धावांवर गमावले. कर्णधार आरोन फिंच, मॅथ्यू वेड आणि पदार्पणवीर जोश फिलिप बॅटने फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मिचेल मार्शने आपली बाजू धरून ठेवली होती परंतु ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस त्यालाही साथ देऊ शकले नाहीत. मार्शने45 धावा केल्या. किवी संघाकडून ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथीने कांगारू संघाला सुरुवातीला मोठे धक्के दिले आणि दोघांनीही चार विकेट्स घेतल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)