NZ vs AUS 1st T20I 2021 Live Online Streaming and Match Timings in India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन व TV Telecast कसे पाहणार, जाणून घ्या

FanCode App वर चाहते सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहू शकतात. तथापि, चाहत्यांना यासाठी नाममात्र शुल्क भरावे लागेल, ज्याचा तपशील अ‍ॅपवर उपलब्ध असेल. दोन्ही संघातील हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल येथे होईल.

जेम्स नीशाम (Photo Credit: Getty)

New Zealand vs Australia 1st T20I 2021 Live Online Streaming: क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हेग्ली ओव्हल येथे न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) पहिल्या टी-20 सामन्यासाठी आमने-सामने येणार आहेत. न्यूझीलंड दौऱ्यावर दोन्ही संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहेत. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात हे दोन्ही दहाव्यांदा आमने-सामने येत आहेत. अनेक वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघ किवी देशात खेळताना दिसत आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात यजमान संघ बर्‍यापैकी मजबूत झाला आहे. काईल जेमीसन, ट्रेंट बोल्ट, टिम सेफर्ट आणि मार्टिन गप्टिल किवी संघासाठी मालिका जिंकण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील तर, ऑस्ट्रेलियन संघाचा झे रिचर्डसन महत्त्वाचा खेळाडू असेल. दोन्ही संघातील हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल येथे होणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सामन्याच्या अर्धातासपूर्वी टॉस होईल. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता खेळला सुरुवात होणार आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगबद्दल बोलायचे तर FanCode App वर चाहते सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहू शकतात. तथापि, चाहत्यांना यासाठी नाममात्र शुल्क भरावे लागेल, ज्याचा तपशील अ‍ॅपवर उपलब्ध असेल. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिपने टी-20 पदार्पण केलं असून कांगारू संघाकडून टी-20 खेळणारा तो 96वा क्रिकेटर ठरला. कांगारू संघाला यापूर्वी भारताविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यामुळे, किवी संघाविरुद्ध मालिकेतून ते विजयपथावर परतण्याच्या प्रयत्नात असतील.

पहा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), हमीश बेनेट, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मार्टिन गप्टिल, काईल जेमीसन, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी आणि टिम साउदी.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), अ‍ॅश्टन अगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडर्मोट, रिले मेरिडिथ, जोश फिलिप, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर संघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅश्टन टर्नर, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड आणि अ‍ॅडम झांपा.