IPL Auction 2025 Live

रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही 'या' क्रिकेटपटूने केली आहे IPL विजेतेपदाची हॅटट्रिक, जाणून व्हाल थक्क

तो महेंद्र सिंह धोनी आणि रोहित शर्मा नव्हे तर दुसराच खेळाडू आहे जो धोनीचा सहकारी राहिला आहे आणि ज्याचे नाव ऐकताच तुम्हालाही नवल वाटेल. धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी कर्ण शर्मा हा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे ज्याने सलग तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) इंडियन प्रीमिअर लीगमधील (Indian Premier League) सर्वत प्रसिद्ध नावांपैकी एक आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स टीमने विक्रमी चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. सीएसकेची विजयी टक्केवारी देखील सर्वोत्कृष्ट आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन विजेतेपद जिंकले आहेत. धोनी एकमात्र खेळाडू खेळाडू आहे ज्याने एकूण 9 आयपीएल फायनल फायनल. त्याने सीएसके बरोबर 8 तर राइझिंग पुणे सुपरगिजंटबरोबर 1 फायनल सामना खेळला आहे. दुसरीकडे, रोहितने 5 आयपीएल फायनल खेळले आहेत. पण, आयपीएलमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने स्पर्धा जिंकण्याची हॅटट्रिक केली आहे. तो रोहित किंवा धोनी नव्हे तर दुसराच खेळाडू आहे जो धोनीचा सहकारी राहिला आहे आणि ज्याचे नाव ऐकताच तुम्हालाही नवल वाटेल. (Coronavirus: चेन्नई सुपर किंग्जच्या मार्केट व्हॅल्यूत मोठी घसरण, IPL च्या अनिश्चिततेमुळे झाले कोटी रुपयांचे नुकसान)

चेन्नई सुपर किंग्सने 2010, 11 आणि 18 मध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकले तर मुंबई इंडियन्सने 13, 15 17 आणि 19 असे चार विजय मिळवले आहेत. पण, धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी कर्ण शर्मा (Karn Sharma) हा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे ज्याने सलग तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. 2016 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चा पराभव करणार्‍या सनरायझर्स हैदराबादपासून (Sunrisers Hyderabad) कर्णच्या जेतेपदाच्या हॅटट्रिकची सुरुवात झाली. पुढील सत्रात एसआरएचने कर्णला रिलीज केले. लिलावात मुंबई फ्रँचायसीने सर्वांना चकित करत त्याला 3.2 कोटीमध्ये खरेदी केले. कर्णने या मोसमात 7 सामने खेळले आणि 13 गडी बाद केले. 2018 मध्ये कर्ण पुन्हा एकदा लिलावात आला आणि चेन्नईने त्याचा 5 कोटी रुपयात टीममध्ये समावेश केला. सीएसकेकडून कर्णाने 6 सामन्यांत चार गडी बाद केले. तो विजेत्या संघाचा सदस्य होता. 2019 मध्ये कर्ण चेन्नईबरोबर राहिला, पण त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.

यंदाचे आयपीएल कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले असल्याने स्पर्धेची सुरुवात लांबणीवर गेली आहे. त्यामुळे, यंदा सर्व खेळाडू घरीच वेळ घालवत आहे. 29 मार्चपासून सुरु होणारं आयपीएल 15 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आणि भारतात कोविड-19 ची स्थिती पाहता आयपीएलचे आयोजन होणार की नाही यावर अजूनही संभ्रम कायम आहे.