Nicholas Pooran Milestone: निकोलस पूरनने मोहम्मद रिझवानचा विक्रम काढला मोडीत, असा करणारा ठरला पहिला फलंदाज

पूरनने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 9 सामन्यात 312 धावा केल्या आहेत. सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

निकोलस पूरन (Photo Credit: Getty Images)

Nicholas Pooran New Record: वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. 27 सप्टेंबर रोजी सीपीएलमध्ये 5 धावा करून त्याने हा खास विक्रम आपल्या नावे केला. यासह त्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. पूरनने बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध 27 धावांची इनिंग खेळली होती. निकोलस पूरनने अलीकडेच टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. यासह, तो टी-20 क्रिकेटच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये 2036 धावा केल्या होत्या. निकोलस पूरनच्या आता टी-20 क्रिकेटमध्ये 2059 धावा आहेत.

निकोलस पूरन यांचे 2024 हे वर्ष खूपच नेत्रदीपक ठरले आहे. पूरनने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 9 सामन्यात 312 धावा केल्या आहेत. सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 हून अधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. (हे देखील वाचा: ENG vs AUS: 6,0,6,6,6,4… लिव्हिंगस्टोन मिचेल स्टार्कला दिवसा दाखवले तारे, एकाच षटकात ठोकल्या 28 धावा; नावावर नोंदवला लाजीरवाणा विक्रम)

लखनौ सुपर जायंट्स ठेवू शकतात कायम 

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघ निकोलस पूरनला कायम ठेवू शकतो. मागील आयपीएल मोसमात पूरनने बॅटने अप्रतिम कामगिरी केली होती. याशिवाय तो एलएसजीचा उपकर्णधार होता. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची आज बैठक होणार आहे. ज्यामध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयला मिळालेल्या अहवालानुसार प्रत्येक संघ 5 खेळाडूंना कायम ठेवू शकतो.