India Women vs New Zealand Women, 4th Match Live Score Update: न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनचे अर्धशतक, भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य

टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND W vs NZ W (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. तर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 67 धावा फलकावर लावल्या. न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 160 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डेव्हाईनने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. तिच्या या स्फोटक खेळीत सोफी डिव्हाईनने 36 चेंडूत सात चौकार मारले. सोफी डिव्हाईनशिवाय जॉर्जिया प्लिमरने 34 धावा केल्या.

टीम इंडियाला पहिले यश मिळाले. टीम इंडियाकडून रेणुका सिंह ठाकूरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. रेणुका सिंग ठाकूरशिवाय अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 161 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना स्पर्धेची विजयाने सुरुवात करायची आहे.